Navneet Rana | नवनीत राणा यांना न्यायालयाचा दणका!; कोर्टाकडून नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंह कौर फरार घोषीत

0
251
Navneet Rana | shivdi court navneet rana father harbhajan singh was declared fugitive by the court
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने जात पडताळणी प्रकरणी दणका दिला आहे. कोर्टाने खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांचे वडील हरभजन सिंह कौर (Harbhajan Singh Kaur) यांना फरार घोषीत केले. तसेच राणा यांच्या वडीलांना एक हजार रूपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे.

 

शिवडी महानगर दंडाधिकारी (Shivdi Metropolitan Magistrate) न्यायालयाने खासदार राणा यांना जोरदार धक्का दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात आणि मुलुंड पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेली प्रकरणे दोन्ही प्रकरणे वेगळे असल्याचे निरीक्षण शिवडी न्यायालयाने नोंदविले आहे. त्यामुळे याप्रकरणी महिनाभरात कोर्टापुढे हजर न झाल्यास प्रॉपर्टी जप्त करण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ फेब्रुवारी पर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

 

खासदार नवनीत राणा (Navneet Rana) या अमरावतीतील ज्या मतदारसंघातून निवडूण आल्या आहेत तो मतदारसंघ अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी राखीव होता. नवनीत राणा यांनी आपण अनुसूचित जाती असल्याचा दावा करून ती निवडणुक लढवली. मात्र, यावेळी नवनीत राणा यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या जातीचा दाखला आणि शाळा सोडल्याचे दाखल्यामध्ये फेरफार केल्याचे आढळून आले. त्यानंतर खासदार नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंह कौर यांच्याविरोधात मुलुंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात महिनाभरात दोनदा वारंट बजावले आहे. त्याविरोधात राणा यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेत, याप्रकरणातून दोषमुक्त करण्याची विनंती केली होती. मात्र ही याचिका मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावली होती.

मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) यांचे जातप्रमाणपत्र ८ जून २०२१ रोजी रद्द केलं होतं. याशिवाय त्यांना न्यायालयाकडून दोन लाख रूपयांचा दंडदेखील ठोठावण्यात आला होता. उच्च न्यायालयाचा या निर्णयामुळे खासदार नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली होती. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) आणि सुनील भालेराव (Sunil Bhalerao) यांनी नवनीत राणा यांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिका २०१७ मध्ये उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या.

 

खासदार नवनीत राणा यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेले जात प्रमाणपत्र बोगस आहे.
त्यांनी जात प्रमाणपत्र समितीसमोर देखील त्यांच्या जातीचा खोटा दावा केला आहे.
असा आरोप याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला होता. त्यानंतर हायकोर्टाने निर्णय देत जातप्रमाणपत्र (Caste Certificate) रद्द केले होते.
त्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. दि.२२ जून २०२१ रोजी झालेल्या सुनावणीत खासदार नवनीत राणा
यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. जातप्रमाणपत्र रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती.

 

Web Title :- Navneet Rana | shivdi court navneet rana father harbhajan singh was declared fugitive by the court

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Priyanka Chaturvedi | शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींचे शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र; म्हणाल्या…

Maharashtra Political Crisis | शिवसेना कुणाची? यावर आज निवडणुक आयोगापुढे महत्वाची सुनावणी

Pune Pimpri Crime News | विद्यार्थ्याच्या डोक्याला पिस्टल लावून लुटले, रावेत मधील घटना