Navneet Rana | संजय राऊतांना आलेल्या धमकीची चौकशी झाली पाहिजे; त्यांची वक्तव्ये म्हणजे…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटला आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्ष सत्ताधारी भाजप शिंदे गटाला धारेवर धरत आहेत. त्यातच कर्नाटकात बेळगाव सीमेवर कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते महाराष्ट्रातील गाड्यांवर दगडफेक आणि तोडफोडीचे प्रकार करत आहेत. त्यामुळे हा वाद चिघळला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत कर्नाटक विरोधात आक्रमक झाले आहेत. त्यामुळे त्यांना कन्नड रक्षण वेदिकेच्या लोकांनी फोन करून धमकी दिली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. त्यावर अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांना आलेल्या धमकीची चौकशी झाली पाहिजे. त्यांची वक्तव्ये म्हणजे अजेंडा असतो. त्यामुळे चौकशी झाली पाहिजे, असे नवनीत राणा (Navneet Rana) म्हणाल्या आहेत.
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावरून संजय राऊत वारंवार परखड भूमिका घेत आहेत. ते आपली परखड मते मांडत आहेत. त्यामुळे त्यांना कन्नड रक्षण वेदिकेकडून धमकीचे फोन आल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. बेळगाव सीमावासियांवर अन्याय सुरू असूनदेखील शिंदे सरकार काही ठोस भूमिका घेत नाही. शिंदे सरकार षंड, नामर्द असून, राज्य चालविण्यास अपात्र आहे. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मला फोन केले. माझ्यावर हल्ला झाला, तर तो माझ्यावर नसून महाराष्ट्रावर झालेला हल्ला असेल, असे राऊत म्हणाले होते.
त्यावर नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, धमकी कुणाला येत असेल, तर त्याची चौकशी झाली पाहिजे.
लोकप्रतिनिधीला कोणी थेट फोन करत असेल, तर त्याची चौकशी अधिक गांभीर्याने घेतली पाहिजे.
राऊत यांच्या वक्तव्यामागे नेहमी काही ना काही अजेंडा असतो. यावेळीसुद्धा असेल.
त्यामुळे या फोन कॉलची खरोखरच चौकशी झाली पाहिजे.
Web Title :- Navneet Rana | The threat to Sanjay Raut should be investigated
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update