Navneet Rana Troll | खासदार नवनीत राणा सोशल मीडियावर ट्रोल; MRI Scan चे फोटो केले होते शेअर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Navneet Rana Troll | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचा इशारा देणाऱ्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana), आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांना नुकताच सशर्त जामीन मिळाला आहे. न्यायालयाने (Court) राणा दाम्पत्याला (Rana couple) प्रसार माध्यमांशी न बोलण्याची सूचनाही केली आहे. दरम्यान, सध्या खासदार नवनीत राणा यांचा एक फोटो त्यांच्याच कार्यालयाने प्रसिद्ध केला आहे. हा फोटो एमआरआय स्कॅन (MRI scan) करतानाचा आहे. त्यावरून सोशल मीडियावर त्या चांगल्याच ट्रोल (Navneet Rana Troll) झाल्या आहेत.

 

खासदार राणा (Navneet Rana Troll) यांच्यावर लिलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) उपचार सुरू आहे. शनिवारी त्यांचे एमआरआय स्कॅन करण्यात आले. तथापि, एमआरआय स्कॅन करतेवेळीचे त्यांचे फोटो समोर आल्यामुळे त्यांना टीकेचा सामना करावा लागला. कारण रुग्णाशिवाय एमआरआय स्कॅनिंग रूममध्ये अन्य कोणालाही परवानगी नसते. कॅमेरा, मोबाईल आशा इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेऊन जाण्यास बंदी असते. मात्र, एएनआय या वृत्तसंस्थेने राणा यांचे एमआरआय करतेवेळीचे फोटो ट्विटरवर पोस्ट केले. तसेच हे फोटो खासदाराच्या कार्यालयाकडून शेअर केल्याचेही वृत्तसंस्थेने स्पष्ट केले. यावरून नेटकऱ्यांनी राणा यांना धारेवर धरलेच पण लीलावती रुग्णालयावरही नेटकऱ्यांनी निशाणा साधला.

 

 

नर्सच्या जागी कॅमेरामन बसवलाय का?

नेटकऱ्यांनी लीलावती रुग्णालयावर प्रश्नांचा भडिमार केला आहे. रुग्णालयातील ‘एमआरआय कक्षात मोबाइल किंवा कॅमेरा कसा पोहोचतो?, रुग्णालयात नर्सच्या जागी कॅमेरामन बसवला आहे असे वाटत आहे. हे सुरक्षा मानकांचे उल्लंघन नाही का? लीलावती रुग्णालय लॅबच्या आतमध्येही फोटो काढण्यास परवानगी देते का?’ असे एक नाही तर अनेक प्रश्न उपस्थित केले आहे.

 

इतकाच नाही तर पुढे जाऊन नेटकऱ्यांनी #ड्रामाअलर्ट, #नौटंकी, #नौटंकीबाज, #बंटीबबली असे हॅशटॅग्स वापरत, ‘तुम्ही जर एमआरआय मशीनपर्यंत कॅमेरा घेऊन जात असाल आणि चेहरा कॅमेऱ्यात यावा यासाठी धडपड करीत असाल तर तुमची नाटकं फक्त प्रसिद्धीसाठी चालू आहे, असे अनेक ट्विट आणि पोस्टस् करीत आहेत.

 

Web Title :- Navneet Rana Troll | how did the camera reach the mri room of the lilavati hospital mp navneet rana troll

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा