Navneet Rana | ‘तिथे मी डोक्याला कफन आणि भगवा बांधून उभी राहीन,’ हनुमान चालिसा मुद्यावर नवनीत राणा पुन्हा आक्रमक

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – जिथे प्रभू रामचंद्र आणि हनुमंताला विरोध केला जाईल तिथे मी डोक्याला कफन बांधून उभी राहिन. असा आक्रमक पवित्रा खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी घेतला आहे. खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीमध्ये हजारो महिलांच्या उपस्थितीत हनुमान चालिसा पठन केले. त्यावेळी बोलताना, शिवसेना आणि महाविकास आघाडी ही प्रभू रामचंद्रांना विरोध करते हे मी आंदोलनाच्या वेळी पाहिलं. असं म्हणत त्यांनी (Navneet Rana) महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला.
यावेळी बोलताना खासदार नवनीत राणा म्हणाल्या, की जय श्रीरामचा नारा इतका मोठ्याने द्या की प्रभू रामचंद्रांना विरोध करणाऱ्या प्रत्येकापर्यंत हा नारा पोहचला पाहिजे. कुणी कितीही विरोध केला तरी आमचा आवाज कधीही कमी होणार नाही. महिलांना कुणी शांत करू शकत नाही. अनादिकाळापासून महिला लढणारी आहे. महिला लढत राहणार. असंही राणा यावेळी बोलताना म्हणाल्या.
या देशाची आम्ही पाळत आहोत. मात्र जय श्रीरामांचा नारा आम्ही देणारचं असंही खासदार नवनीत राणा यावेळी बोलताना म्हणाल्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, ‘हक्काने लढणं हे आम्हाला आमच्या देशाने शिकवलं आहे. मी फक्त एवढंच म्हटलं होतं की उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना मी त्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणणार. फक्त एवढी घोषणा केल्यावर जर १४ दिवस मला तुरुंगात टाकलं होतं. तेव्हाच मी ठरवलं होतं की जिथे जिथे हनुमंताला आणि प्रभू रामचंद्राला विरोध झाला तर मी सहन करणार नाही. धर्माच्या विरोधात कुणीही उभं राहिलं तर त्यांच्या विरोधात सर्वात आधी मी उभी राहणार आहे.’
दरम्यान, हनुमान चालिसेमुळे (Hanuman Chalisa) महाराष्ट्र सुखी झाला असल्याचेही त्या म्हणाल्या.
‘महाराष्ट्राला सुखी ठेवण्यासाठी आपण हनुमान चालिसा पठन करणार होतो. आणि ते आपण करून दाखवलं.
कारण आता राज्यात हिंदू विचारांना मानणारे शिंदे-फडणवीस सरकार आले आहे.
आम्ही त्यांच्यासोबत शेवटपर्यंत उभे राहू यात माझ्या मनात काहीही शंका नाही.
अमरावतीची खासदार आणि या देशाची नागरिक म्हणून मला या ठिकाणी विकास करायचा आहे.
मला सगळ्यांनी याअगोदर अमरावतीची सून म्हणून सर्वांनी पाहिले आहे. पण गेल्या वर्षभरापासून लढा देणारी महिला म्हणून तुम्ही मला पाहत आहात.’ असं देखील यावेळी बोलताना नवनीत राणा (Navneet Rana) म्हणाल्या.
यावेळी बोलताना अमरावतीत १११ फुटांची भव्य हनुमान मुर्ती उभारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आणि त्यासाठी स्थानिकांकडून एक रूपया आणि एक वीट द्यावी.
असे आवाहन यावेळी बोलताना खासदार नवनीत राणा यांनी उपस्थितांना केले.
Web Title :- Navneet Rana | wherever lord ramachandra and hanumanta are opposed i will stand said mp navneet rana
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Supriya Sule | ‘वंचित’ सोबतच्या युतीबाबत स्पष्टचं बोलल्या सुप्रिया सुळे; म्हणाल्या…