Navneet Ravi Rana | …म्हणून राणा दाम्पत्याने ‘मातोश्री’ वर जाण्याचा निर्णय घेतला मागे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Navneet Ravi Rana | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या निवासस्थानी ‘मातोश्री’ वर (Matoshree) जाऊन हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) वाचणार असल्याचा निर्धार अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी केला होता. मात्र राणा दाम्पत्याने ‘मातोश्री’ वर जाण्याचा निर्णय मागे घेतला आहे. अमरावतीवरून (Amravati) आलेल्या राणा दाम्पत्याने निर्णय कसा बदलला असा प्रश्न सर्वांना पडला असून याबाबत रवी राणा यांनी माहिती दिली आहे.

 

उद्या म्हणजेच रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) जे देशाचा गौरव आहेत ते मुंबई दौऱ्यावर आहेत. एक आमदार आणि खासदार म्हणून आमचं कर्तव्य आहे. महाराष्ट्रामध्ये पंतप्रधानांसारखं मोठं व्यक्तिमत्त्व येत आहे त्यांच्या दौऱ्याला कुठेही गालबोट लागलं नाही पाहिजे, यासाठी आम्ही माघार घेत असल्याचं रवी राणा यांनी सांगितलं.

 

आम्ही कुठल्याही दबावाला बळी पडणारे लोक नसून लोकांची सेवा करून लोकसभेत आणि विधानभवनात पोहोचलो आहोत.
आज आम्ही ठरवलं की महाराष्ट्रातील जनतेला, पोलिसांना त्रास होत आहे.
मुख्यमंत्र्यांनी जरी हनुमान चालिसेचा अवमान केला असला तरी सगळ्यांना होणारा त्रास बघता आम्ही आमचं आंदोलन संपवत असल्याचं राणा म्हणाले. यावेळी बोलताना राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केला.

दरम्यान, काही शिवसैनिकांना पाठवत मुख्यमंत्र्यांनी आमच्या घरावर हल्ला केला.
रवी राणा आणि नवनीत राणा यांना मारा, त्यांच्या घरावर हल्ला करा असे त्यांना आदेश होते.
मुख्यमंत्रीच जर राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवत असतील तर हे महाराष्ट्राचं दुर्देव असून महाराष्ट्र पश्चिम बंगालच्या (West Bengal) दिशेने जात असल्याची टीका राणा यांनी केली.

 

Web Title :- Navneet Ravi Rana | Navneet Ravi Rana rana couple withdraw hanuman chalisa pathan in outside matoshree

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा