मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Navneet Ravi Rana | एप्रिल महिन्यात सुरू झालेल्या हनुमान चालिसा वादाप्रकरणी राणा दाम्पत्याच्या (Navneet Ravi Rana) अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात राणा दाम्पत्यांविरोधात (Rana Couple) मुंबई सत्र न्यायालयानं वॉरंट जारी केलं आहे. न्यायमूर्ती राहुल रोकडे यांनी जारी केलेलं हे वॉरंट जामीनपात्र असले तरी येत्या 14 डिसेंबरच्या सुनावणीसाठी जर दोघेही गैरहजर राहिले, तर त्यांना अटक होऊ शकते.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याचा प्रयत्न केला होता. तिथे पोलिसांबरोबर उद्भवलेल्या वादानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. तसेच त्यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
तीन दिवस अटकेत राहिल्यानंतर न्यायालयाने त्यांना सशर्त जमीन मंजूर केला होता.
Web Title :- Navneet Ravi Rana | the court issued warrants against navneet rana and ravi rana
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Virat Kohli | विराट कोहलीच्या नावावर आणखी एक विक्रम; ‘हा’ विक्रम करणारा ठरला पहिला क्रिकेटर
Shweta Tiwari | श्वेता तिवारीने ‘तो’ फोटो शेअर करताच नेटकरी संतापले; म्हणाले लाज वाटते का…..