‘जय श्रीरामचे नारे’, पण ‘इथे’ नको : नवनीत कौर राणा यांचा आक्षेप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सगळे देव एकच आहे आणि मी सगळ्या देवांना मानते, मात्र कुणाला तरी लक्ष्य करण्यासाठी संसदेत जय श्रीरामचे नारे देणे योग्य नाही आणि संसद ही त्यासाठी जागा अजिबात नाही अशा शब्दात महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष खासदार नवनीत कौर राणा यांनी आक्षेप नोंदविला आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ झाला आहे. मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर हे पहिलेच अधिवेशन होत आहे. यादरम्यान शपथविधीच्या वेळी जय श्रीरामचे नारे देण्यात आले, त्याला नवनीत कौर राणा यांनी आक्षेप घेतला आहे. नवनीत कौर राणा यांनी म्हटले आहे कि, संसद ही जय श्रीरामचे नारे देण्यास योग्य जागा नाही तर मंदिरांमध्ये तुम्ही नारे देऊ शकता. मी सर्व देवांना मानते आणि सगळे देव हे एकच आहेत, या मताची मी आहे.

मात्र कुणाला तरी लक्ष्य करण्यासाठी जय श्रीरामचे नारे द्यायचे ही बाब नक्कीच योग्य नाही आणि त्यासाठी संसद ही जागाही योग्य नाही, त्यामुळे संसदेत अशा रीतीने नारे देऊ नये अशी भूमिका नवनीत कौर राणा यांनी घेतल्याने सरकार कोणती प्रतिक्रिया देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवनीत कौर राणा या अमरावतीमधून निवडून आलेल्या आहेत.

सिनेजगत

Video : जान्हवी कपूरचा ‘हा’ Belly डान्स पाहून यूजर्संनी दिला ‘सल्‍ला’, बघता-बघता व्हिडीओ ‘व्हायरल’

काळवीट शिकार प्रकरण : ‘भाईजान’ सलमानबाबत जोधपूर कोर्टाचा ‘मोठा’ निर्णय

दोन पत्नीसोबत राहतो ‘हा’ मोठा सिंगर, ज्याचे आहेत लाखो ‘फॅन’

शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा बॉलिवूडमध्ये ‘बाप’माणसासोबत ‘डेब्यू’

 

You might also like