‘नवरात्री’त ‘गृहप्रवेश’ करताना ‘या’ 10 गोष्टी नक्की लक्षात ठेवा, घरात राहिल देवी ‘लक्ष्मी’चा वावर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवरात्रीच्या शुभ पर्वास सुरुवात होणार आहे. नवरात्रीचे नऊ तिथी अशा असतील ज्यात कोणताही मुहूर्त न पाहता कोणतेही शुभ कार्य करता येईल. नवरात्रीच्या शुभ पर्वात अनेक जण गृह प्रवेश करतात. शास्त्रानुसार असे मानले जाते की नवरात्री निमित्त गृह प्रवेश केल्याने सुख आणि समृद्धी येते. देवी लक्ष्मीचा वास आणि अधिक पट फळप्राप्ती होते. गृह प्रवेश करताना काही ध्यानात राहिले पाहिजेत अशा बाबी महत्वाच्या असतात.

kalash

1) नवरात्रीत गृह प्रवेश करताना कलश नक्की सोबत ठेवा, कलशात पाणी ठेवून त्यात आंब्याच्या डाहळ्या ठेवा. कलशावर लाल रंगाचा स्वास्तिक काढा.
2) गृहप्रवेश करताना कलशाबरोबर नारळ, हळद, गुळ, तांदूळ (अक्षता) नक्की ठेवा.
3) गृह प्रवेश करताना पती पत्नीने सोबत प्रवेश करावा. नव्या घरात प्रवेश करताना पतीने आपला डावा पाय पुढे करा आणि पत्नीने आपला उजवा पाय पुढे ठेवा. यामुळे सुख समृद्धी येईल.
4) गृह प्रवेश करताना गणपतीच्या मूर्ती दक्षिणावर्ती शंख आणि श्रीयंत्रची स्थापना करुन पूजा करावी.
5) नव्या घरात ईशान्य कोपऱ्यातून पाण्याने भरलेला कलश ठेवा.
6) घराच्या प्रत्येक कोपऱ्यात गंगाजल, हळद आणि तांदूळ शिंपडा.
7) नव्या घरात स्वयंपाक घरात प्रवेश करताना गुळाचा तुकडा नक्की ठेवा. यामुळे घरातून वास्तुदोष संपेल.
8) घराच्या आसपास असलेल्या मंदिरात जाऊन देवदर्शन घ्या, गरीबांना, गरजूंना दान करा.
9) गृह प्रवेशावेळी पूजा करण्यासाठी आलेल्या ब्राम्हणांना दान दक्षिणा करा.
10) नवरात्रीत गृह प्रवेश करताना दुर्गा सप्तशीचा पाठ आणि रामचरित मानसचे पठन करा हे शुभकारक ठरेल.
navratri 2019 enter new house during navratri griha pravesh keep these 10 things in mind