Navratri 2020 : आता नवरात्रीसाठी 9 रंगांचे मास्क बाजारात, महिलांकडून मागणी, साडीलाही होणार ‘मॅचिंग’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे यंदा मास्कला प्रंचड मागणी वाढली आहे. नवरात्रोत्सवाला शनिवारपासून प्रारंभ होत आहे. त्यामुळे बाजारपेठेत नऊ रंगाच्या साडीला मॅचिंग असे नऊ रंगाचे मास्क विक्रीसाठी दाकल झाले आहेत. हे मास्क नोकरदार महिलांच्या पसंतीस उतरले असून खरेदीची लगभग दिसून येत आहे.

नवरात्रोत्सवात नऊ रंगाना अधिक महत्व असते. महिलांमध्ये नऊ रंगाचे आकर्षण असल्याने त्या दिवसाच्या रंगाप्रमाणे साडी- ड्रेसबरोबर त्याला मॅचिंग टॅटू काढण्याकडेही महिलांचा गेल्या काही वर्षापासून कल वाढला होता. पण यंदा कोरोनामुळे त्याला चाप बसला आहे. हे जरी बंद असले तरी बाजारपेठेत त्या त्या रंगाना मॅचिंग मास्क विक्रीस आले आहेत. तसेच बाजारपेठेत पुरुषवर्गासाठी नऊ रंगाचे मास्क उपलब्ध झाले आहेत. महिलांसाठी आकर्षक म्हणून त्याला लेस लावण्यात आले आहे. तर पुरूषांसाठी त्याला इलेस्टीक लावल्याचे फॅशन डिझायानर शिल्पा चव्हाण यांनी सांगितले. वक्र आणि त्रिकोणी आकारात ते उपलब्ध आहेत.

महिलांसाठी यात खणांचे आणि काठांचे मास्क उपलब्ध आहेत. राखाडी, नारंगी, सफेद, लाल, गडद निळा, हिरवा, पिवळा, जांभळा, मोरपंखी आदी नऊ रंग बाजारात उपलब्ध झाले आहेत. यंदा मास्कमुळे नवरात्र रंगीबरेगी साजरी होणार आहे. कोरोनामुळे यंदा सवर्च सण उत्सवांना ब्रेक लागला आहे. त्यामुळे यंदा दांडियारासलाही चाप बसणार आहे. शहरातील नवरात्रोत्सवांना कोरोनाचे सर्व नियंम पाळून उत्सव साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.