आज घटनस्थापना : नवरात्रोत्सवासाठी सजले अंबाबाईचे मंदिर

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन

शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात आजपासून सुरू होत आहे. यासाठी कोल्हापूरमधील प्रसिद्ध अंबाबाई मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला अंबाबाईचे मंदिर विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते. अंबाबाई मंदिर आवारातील दीपमाळा, मंदिराची पाच शिखरे, गरूड मंडप परिसर आणि संपूर्ण मंदिराभोवतीच्या शिल्पाकृतींची स्वच्छता पूर्ण झाली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’289e3ba4-cc3d-11e8-a22b-bb5c7d840af9′]

मुख्य मंदिरातील गाभारा व गर्भकुडीसह महालक्ष्मी यंत्र स्थानाची स्वच्छताही झाली आहे. उत्सवासाठी मंदिराच्या ५ शिखरांपासून ते दीपमाळा व गरूड मंडपाच्या छतावर नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कारंजा चौकातील दिवेही सुरू करण्यात आले आहेत. नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला अंबाबाई मंदिर उजळून निघाले होते.

चिंचवडमध्ये आदीशक्तीचा जागर

सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. आपत्कालीन स्थिती निर्माण झाली तर त्यासाठी सुद्धा प्रशासनाने उपाययोजना करून ठेवली आहे. भाविकांना ऊन्हाचा त्रास होवू नये यासाठी दर्शन मंडपाला संपूर्ण पांढरे कापड लावण्यात आले आहे. दर्शन रांगेतच भाविकांना पाणी देण्याची सोय काही स्वयंसेवी संस्था करणार आहेत. शिवाय तांत्रिक सुविधा, सुरक्षा यंत्रणेची अंतिम तपासणी सुद्धा देवस्थान समितीकडून करण्यात आली आहे. उत्सवादरम्यान भविकांना लवकर दर्शन मिळावे यासाठी सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत.

[amazon_link asins=’B00P15Y2VW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’385adbf1-cc3d-11e8-b680-c3bffbae874f’]