नवरात्री दरम्यान चुकूनही करू नका ‘ही’ 10 कामे, अन्यथा देवीचा होईल ‘कोप’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टिम- नवरात्रीचा पवित्र सण जवळ येत आहे. देवीचे असंख्य भक्त हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यासाठी तयारी करत आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की नवरात्रात नऊ दिवसांचा उपवास ठेवताना काही नियम पाळावे लागतील, जेणेकरून दुर्गादेवी प्रसन्न होईल . जर या नियमांचे पालन केले नाही तर दुर्गादेवीच्या पूजेमध्ये विस्कळीतपणा येईल. जर तुम्हाला आई दुर्गाला संतुष्ट करायचे असेल तर खाली नमूद केलेल्या गोष्टी लक्षात ठेवा…

१. नवरात्रीच्या वेळी घरात तुम्ही अखंड ज्योत पेटवत असाल तर या दिवसात घर रिकामे ठेवू नका. जर घराबाहेर जाणे आवश्यक असेल तर एखाद्या नातेवाईक किंवा विशेष ओळखीच्या व्यक्तीला घरात राहू द्या.

२. जर तुम्ही चालीसा, मंत्र किंवा सप्तशती वाचत असाल तर वाचन करताना मध्येच बोलण्याची किंवा उठण्याची चूक करू नका. हे नकारात्मक शक्ती निर्माण करते.

३.जे लोक उपवास ठेवतात त्यांना विशेषतः हे लक्षात ठेवले पाहिजे की नखे, दाढी-मिशा आणि डोक्याचे केस हे नऊ दिवस कापत नाहीत. ही सर्व कामे नवरात्र सुरू होण्यापूर्वी करा किंवा नवरात्र संपल्यानंतर करा.

४. उपवास करणाऱ्या लोकांनी बेल्ट, चप्पल, शूज किंवा पिशव्या अशा चामड्याने बनवलेल्या वस्तू वापरू नयेत.

५. व्रत ठेवणाऱ्या लोकांनी नऊ दिवस लिंबू कापू नये. तसेच, कांदा, लसूण आणि मांस खाऊ नये.

६. नऊ दिवस उपवास पाळणार्‍या लोकांनी घाणेरडे आणि न धुतलेले कपडे घालू नयेत.

७. उपवासाच्या वेळी नऊ दिवस अन्नधान्य आणि मीठ खाऊ नये.

८.  विष्णू पुराणात असे सांगितले आहे की नवरात्र उपवासात दिवसा झोपू नये.

९. नवरात्रीच्या उपवासात शारीरिक संबंध बनवू नयेत याची पुरूष व स्त्रिया दोघांनीही विशेष काळजी घ्यावी.

१०. उपवास दरम्यान बरेच लोक तंबाखूचे सेवन करतात जे चुकीचे आहे. असे केल्याने देवीचा उपवास यशस्वी होत नाही.

Visit : policenama.com