नवरात्री आणि दसर्‍याला असणार अतिशय शुभ ‘योग’, ग्रह आणि नक्षत्रांचे काय आहे ‘संकेत’, जाणून घ्या

वृत्तसंस्था – पितृपक्ष संपल्यानंतर नवरात्रीस आरंभ होईल. 29 सप्टेंबरला रविवारी आश्विन माहिन्याच्या शुक्ल पक्षच्या प्रतिपदा तिथिला कलशाची स्थापना करण्यात येईल. कलश स्थापनेबरोबरच नऊ दिवसांपर्यंत दुर्गा देवीची पूजाअर्चा, पाठ पठन करण्यात येईल. 7 ऑक्टोबरला महानवमी आणि 8 ऑक्टोबरला दसरा साजरा करण्यात येईल. ज्योतिषाचार्यानुसार नवरात्रीच्या 9 दिवसातील 6 दिवस विशेष असणार आहेत. ज्यामुळे नवरात्रीची पूजा खूपच शुभकारक आणि फलप्रप्ती करुन देणारी ठरेल. यादरम्यान 2 दिवस अमृतसिद्धी, 2 दिवस सर्वार्थ सिद्धी आणि 2 दिवस रवि योग असणार आहे.

कोणत्या दिवशी असणार कोणता योग –
29 सप्टेंबरला प्रतिपदा तिथिवर कलश स्थापना
30 सप्टेंबरला अमृत सिद्धी योग
1 ऑक्टोबरला रवि योग
2 ऑक्टोबर सर्वार्थ सिद्धी
3 ऑक्टोबर रवि योग
4 ऑक्टोबर रवि योग
5 ऑक्टोबर सर्वसिद्धी योग असेल.

नवरात्रीचे 9 दिवस आणि 9 देवी – 

पहिला दिवस- शैलपुत्री
दूसरा दिवस- ब्रह्मचारिणी
तिसरे दिवस- चंद्रघंटा
चौथा दिवस- कुष्मांडा
पाचवा दिवस- स्कंदमाता
सहावा दिवस- कात्यानी
सातवा दिवस- कालरात्री
आठवा दिवस- महागौरी
नववा दिवस- सिद्धीदात्री

दसऱ्याचा शुभयोग –
नवमीच्या दिसऱ्या दिवशी दसरा साजरा करण्यात येतो . 7 ऑक्टोबरला महानवमी दुपारी 12.38 पर्यंत असेल. 8 ऑक्टोबरला विजयादशमी रवि योग मध्ये दुपारी 2.51 पर्यंत असेल. हा योग अत्यंत शुभ मानला जातो.

दुर्गा पूजा –
अष्टमी तिथी – रविवार, 6 ऑक्टोबर 2019
अष्टमी तिथी प्रारंभ – 5 ऑक्टोबर 2019 पासून 9.50 वाजेपर्यंत
अष्टमी तिथी समाप्त – 6 ऑक्टोबर 2019 पासून 10.54 पर्यंत