आता ‘या’ मार्गावरून देखील धावणार PM मोदींची ड्रीम ट्रेन, विमानासारख्या सुविधा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वैष्णो देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या  भाविकांना भारतीय रेल्वेने मोठी भेट दिली. आज गृहमंत्री अमित शहा यांनी वंदे भारत एक्स्प्रेसला ग्रीन सिग्नल दिला आहे. दिल्ली ते कटरा दरम्यान धावणारी ही हायस्पीड ट्रेन 5 ऑक्टोबरपासून सर्वसामान्यांसाठी धावणार आहे.

या ट्रेनला सेमी हाय स्पीड (Train-18) आणि सेमी बुलेट मानले जात आहे. दिल्ली ते कटरा दरम्यान ट्रेनने प्रवास करण्यास आता १२ तासाचा कालावधी लागतो, वंदे भारत सुरू झाल्यानंतर  8 तास कमी लागतील 22439/22440 नवी दिल्ली-श्री माता वैष्णो देवी कटरा -नवी दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेस  (T-18) ) मंगळवार वगळता आठवड्यातून 6 दिवस धावेल.

 या सुविधा मिळतील –

वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये विमानासारख्या सुविधा आहेत. त्यामध्ये एसी, टीव्ही, स्वयंचलित दरवाजे, हायक्लास पँट्री आणि वॉशरूम यांचा समावेश आहे. वंदे भारत एक्स्प्रेसला  16 डब्बे आहेत. त्यामध्ये बसण्यासाठी 1128 जागा आहेत. यात सामान्य 14 डब्बे आहेत ज्यामध्ये 936 सीट आहेत उरलेले 2 आरक्षित डब्बे आहेत त्यामध्ये 104 सीट आहेत.

वंदे भारत एक्स्प्रेसचा रूट –

ट्रेन क्रमांक 2243922439/22440 नवी दिल्ली-श्री माता वैष्णो देवी कटारा-नवी दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेस  (T-18) ) पासून नवी दिल्ली येथून नियमित सेवा सुरू करेल. ही ट्रेन दिल्लीतून सकाळी 6 वाजता निघेल आणि कटरा येथे दुपारी 2 वाजता पोहचणार. त्यानंतर दुपारी पुन्हा 3 वाजता कटरा येथून निघणार आहे आणि रात्री 11 वाजता दिल्लीला पोहचणार आहे.
या मार्गाची दोन्ही बाजूंनी नियमित सेवा 05.10.2019 पासून सुरू होईल आणि ही ट्रेन मंगळवार वगळता आठवड्यातून 6 दिवस धावेल.

भाडे-

वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनमध्ये नवी दिल्लीहून कटरा येथे जाण्यासाठी तुम्हाला सामान्य डब्ब्यासाठी  सुमारे 1630 रुपये भाडे द्यावे लागतील. येथे 1120 रुपयांचा बेस फेअर ,40 रुपये प्रतिवर्ष शुल्क , 45 रुपये सुपरफास्ट शुल्क आणि 61 रुपये जीएसटी आणि कॅटरिंग चार्ज म्हणून 364 रुपये द्यावे लागतील.
वंदे भारत एक्स्प्रेसमधील आरक्षित डब्ब्यासाठी  तुम्हाला सुमारे 3015 रुपये द्यावे लागतील. बेस फेअर म्हणून तुम्हाला 2337 रुपये , 60 रुपये  प्रतिवर्ष शुल्क असेल. 75  रुपये सुपरफास्ट शुल्क असून 124 रुपये म्हणजे जीएसटी आहे. तर  खानपान शुल्क म्हणून 419 रुपये द्यावे लागतील.

Visit : Policenama.com

तुमच्या मुलांच्या डोळ्यांची अशी घ्या काळजी, उपाय जाणून घ्या
जाणून घ्या ‘सेक्शुअल लाइफ’ असंतुष्ट असण्याची कारणे, अशी घ्या काळजी
चिंच आहे बहुगुणी, उन्हाचा कडाका वाढला तर आवश्य खा

शरीरात ‘या’ ठिकाणी लपतो ‘एड्स’चा व्हायरस, संशोधकांनी केला दावा
मधुमेहाचे औषध स्तनाच्या कॅन्सरवर उपयुक्त, चिनी संशोधकांचे मत
मुलांना कोणत्या वयात शाळेत घालावे? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
ऑफिसमध्ये जेवण करताना घ्यावी ‘ही’ काळजी, तुमच्यासाठी ठरु शकते फायदेशीर
नाभीवर लावा २ थेंब दारु, दूर होतील पीरियड्ससंबंधीत ‘या’ समस्या, जाणून घ्या