PM नरेंद्र मोदींचा मुखवटा घालून लोक ‘गरबा’ खेळतात तेव्हा… (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या देशभरात नवरात्रीची धूम सुरु आहे. त्यामुळे देवीला प्रसन्न करण्यासाठी नागरिक विविध प्रकारे देवीची सेवा करत आहेत. गुजरातमध्ये देखील हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असून याठिकाणी गरबा मोठ्या प्रमाणात खेळला जातो.

मात्र यावेळी गुजरातमध्ये खास पद्धतीने गरबा खेळण्यात येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुखवटे घालून याठिकाणी गरबा खेळण्यात येत आहे. लहान मुलांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच जण अशाप्रकारे मुखवटे घालून गरब्याचा आनंद घेत आहेत. आज नवरात्रीचा सातवा दिवस असून कालरात्रि देवीची पूजा करण्यात येते. हे देवीचे सातवे रूप असून मोठ्या भक्तीने देवीची पूजा करण्यात येते.

मां कालरात्रिच्या पूजेने होतो लाभ –
कालरात्रि देवीची पूजा करणे अत्यंत शुभ मानण्यात येते. शत्रुंना आणि विरोधकांना नियंत्रित करण्यासाठी देवीची पूजा फार महत्वाची मानण्यात येते. यामुळे आपल्यामधील नकारात्मकता नष्ट होऊन याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात.

visit : Policenama.com