‘या’ ठिकाणी सोन्याची ५० किलो वजनाची दुर्गामातेची मूर्ती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या देशभरात नवरात्रीची धूम सुरु आहे. त्यामुळे देवीला प्रसन्न करण्यासाठी नागरिक विविध प्रकारे देवीची सेवा करत आहेत. यामुळे दुर्गामातेला प्रसन्न करण्यासाठी कोलकात्यातील एका मंडळाने 50 किलो सोन्यापासून बनवलेल्या देवीच्या मूर्तीची स्थापना केली आहे. याच मंडळाने 2017 मध्ये देवीला सोन्याची साडी घातली होती तर मागील वर्षी चांदीच्या रथावरून त्यांची मिरवणूक काढली होती. या सोन्याच्या मूर्तीची किंमत 20 कोटी रुपये असून 13 फूट उंचीची हि मूर्ती आहे.

या मंडळाचे महासचिव सजल घोष यांनी दिलेल्या माहितीनुसार, मांडव बांधण्यासाठी 250 कामगारांना अडीच महिने तर देवीची मूर्ती बसवण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी लागला. मांडव विविध वस्तुंनी सजवण्यात आला असून इस्कॉन टेम्पलची प्रतिमा देखील बनवण्यात आली आहे. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले कि, संपूर्ण जगभरात आणि देशभरात मशीनद्वारे सोन्याचे दागिने बनवले जात असताना केवळ ‘विश्वकर्मा’ हेच देवीची साडी, मूर्ती आणि रथ बनवू शकतात. मशीनमुळे बंगालमधील अनेक सोन्याच्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

isit : Policenama.com