अभिमानास्पद ! भारतीय मुलीनं आशियाच्या बाहेर सर्वात उंच शिखरावर फडकवला ‘तिरंगा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काम्या कार्तिकेयन या १२ वर्षाच्या विद्यार्थिनीने आशियाबाहेरील सर्वात उंच शिखर माउंट एकांकगुआ सर करून यश संपादन केले. हा विजय मिळवारी काम्या सर्वात तरुण पर्वतारोही ठरली आहे. माउंट एकांकगुआ दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिना येथील एंडीज पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे. काम्या कार्तिकेयन हि मुंबईतील नेव्ही चिल्ड्रन स्कुलमधील सातवीची विद्यार्थिनी आहे. माउंट एकंगगुआची उंची 6969 मीटर असून ते आशियाबाहेरील सर्वोच्च शिखर आहे. कार्तिकेयनने १ फेब्रुवारी रोजी त्या ठिकाणी तिरंगा फडकविला.

नौदल अधिकाऱ्यांनी सांगितले की, काम्याच्या दीर्घकालीन शारीरिक, मानसिक आणि साहसी खेळांमध्ये नियमित सहभाग घेतल्याने तिला कठीण परिस्थितीत चढाई पूर्ण करण्यास मदत झाली. काम्याचे वडील एस. कार्तिकेयन भारतीय नौदलात कमांडर असून आई व्यवसायाने शिक्षिका आहे. लहानपणापासूनच काम्यामधे पर्वतारोहणाची आवड निर्माण झाली. काम्याने याआधीही बऱ्याच उंच पर्वतांवर चढाई केली आहे. यापूर्वी, 24 ऑगस्ट 2019 रोजी, तिने लडाखच्या 6260 मीटर उंच मेंटलक कांगरी 2 देखील सर केला होता.

काम्याने वयाच्या अवघ्या तीन वर्षांपासून पर्वतारोहण सुरू केले. त्यानंतर ती लोणावळ्यात बेसिक ट्रॅकवर जात असे. वयाच्या 9 व्या वर्षी, काम्याने तिच्या पालकांसह उत्तराखंडमध्ये अनेक हाई-अल्टीट्यूड ट्रॅक केले. वयाच्या दहाव्या वर्षी काम्या 5346 मीटर उंचीवर असलेल्या नेपाळमधील एव्हरेस्ट बेस कॅम्पमध्ये पोहोचली होती. सध्या काम्या माउंट स्टोक कांगरी येथे पोहोचणारी सर्वात कमी वयाची पर्वतारोही देखील ठरली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like