Navy Leftnant Amogh Bapat | अत्यंत दुर्देवी ! काही दिवसांपुर्वी प्रमोशन मिळालेल्या मराठमोठया नेव्ही लेफ्टनंटचा दरड दुर्घटनेत करूण अंत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Navy Leftnant Amogh Bapat | हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात बटसेरीच्या गुंसाजवळ छितकुलहून सांगलाकडे निघालेल्या पर्यटकांच्या गाडीवर दरड कोसळली. या दुर्घटनेत गाडीतील 9 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महाराष्ट्रातील एक नेव्ही अधिकारी अमोघ बापट (Navy Leftnant Amogh Bapat) यांचे निधन झाले. ते लेफ्टनंट होते.

ही दुर्घटना आज (सोमवारी) दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली असून भूस्खलनामुळे बास्पा नदीवरील पूल सुद्धा कोसळला आहे. दुर्घटनेत एकुण 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 4 जण राजस्थानचे, 2 छत्तीसगढचे, 1 दिल्लीचा आणि एक मुळ महाराष्ट्राचा रहिवाशी असून एकाची ओळख पटलेली नाही. मृत नेव्ही लेफ्टनंट अमोघ बापट (Amogh Bapat) यांचे कुटुंब छत्तीसगडमध्ये कायम वास्तव्याला असून त्याचे पोस्टिंग अंदमान-निकोबार बेटावर (andaman nicobar island) होते.

तीन दिवसांपूर्वी कोरोबा या मूळगावी रजेवर आलेले अमोघ बापट हे मित्र सतिश कटवार यांच्यासोबत शिमला येथे पर्यटनासाठी गेले होते.
परंतु वाटेतच या दोघांवर काळाने घाला घातला.
अमोघ बापट 4 वर्षांपूर्वी नेव्हीत भरती झाले होते,
त्यांना 9 जुलै रोजी प्रमोशन मिळाले होते.

Web Title :- very sad news : navy leftnant amogh bapat died tragic accident kinnour landslide himachal pradesh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik Crime | दोघा भावांवर सपासप वार करत जीवघेणा हल्ला; नाशिक शहरातील खळबळजनक घटना, Video व्हायरल

Pune Crime | 58 गुंठे जमीन बळकवण्यासाठी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याच्या धमकीच्या गुन्ह्यातील संशयित नितीन हमनेचा जामीन मंजूर

Energy Policies | शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा, ‘हे’ 4 देश करतील जगाचा विध्वंस; महाविनाश रोखण्यासाठी घ्यावी लागेल ‘अ‍ॅक्शन’