नौदलाने वाचवले अधिका-याचे प्राण… दोन दिवस देत होते मृत्यूशी झुंज

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन

भारतीय नौदलाचे शौर्य व साहस हे जग जाहीर आहे. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. गोल्डन ग्लोब रेसदरम्यान हिंदी महासागरात अडकलेले नौदलाचे कमांडर अभिलाष टॉमी यांना वाचवण्यात नौदलाला यश आले आहे. सध्या अभिलाष टॉमी यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना फ्रान्सची मच्छिमार बोट ओसायरिसवर हलवण्यात आले आहे.

गोल्डन ग्लोब रेसदरम्यान हिंदी महासागरात अभिलाष टॉमी यांची शिडाची बोट तुटल्यामुळे ते दोन दिवसांपासून समुद्रात अडकले होते. त्यातच त्यांना गंभीर दुखापत झाल्याने हलताही येत नव्हते तसेच दुपारचे कडकडीत ऊन रात्रीची थंडी व खाण्यापिण्यासाठी काहीच नाही. अश्या अवस्थेत अभिलाषने दोन दिवस मृत्यूशी झुंज दिली. नौदलाने सॅटेलाईटद्वारे त्यांच्याशी संपर्क साधला या नंतर त्यांची प्रकृती चांगली नसल्याची माहिती मिळाली. त्यावेळी अभिलाष यांनी स्ट्रेचरची मागणी केली. अभिलाष यांच्या बचावासाठी भारतासह, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियाच्या बचाव पथकांनी धाव घेतली. यानंतर कमांडर अभिलाष यांच्या रेस्क्यू‌ ऑपरेशनसाठी फ्रेन्च बोट ओसायरिस नेमक्या लोकेशनवर पोहोचण्याच्या बेतात असल्याची माहिती नौदलाने आज सकाळी दिली. अखेर ओसायरिस बोट कमांडर टॉमींजवळ पोहोचली व भारतासह जगभरातील अनेकांचा जीव भांड्यात पडला.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e5b11daf-bff6-11e8-b883-27937ae6c85b’]

अभिलाष टॉमी हे भारतीय नौदलाचे अधिकारी आहेत. गोल्डन ग्लोब रेस मध्ये आपला सहभाग नोंदवला होता. स्पर्धेदरम्यान, समुद्रातील खराब हवामानामुळे त्यांचे शिडाचे जहाज उलटले. समुद्रात वादळ आणि तब्बल 14 मीटर उंच लाटा तसेच 130 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे अभिलाष यांच्या बोट उलटले. वाऱ्याच्या वेगाने बोट तुटल्यामुळे अभिलाष जखमी झाले.

‘दगडूशेठ’ च्या बाप्पांची २१ फुटी श्री विश्वविनायक रथातून वैभवशाली सांगता मिरवणूक

काय आहे गोल्डन ग्लोब रेस 

गोल्डन ग्लोब रेस ही जगातील थरारक नौकानयन स्पर्धा आहे. गोल्डन ग्लोब रेसचे वैशिष्ट्य म्हणजे स्पर्धकाला 50 वर्षापूर्वीची बोट म्हणजे त्यामध्ये अत्याधुनिक काहीही सुविधा नसतात. अशी बोट स्पर्धंकाना वापरावी लागते. केवळ संपर्क यंत्रणेच आधुनिक आहेत. शिडाच्या बोटीने 42 हजार 280 किमीची विश्वभ्रमंती एकट्यानेच करायची असते. ही स्पर्धा फ्रान्समधून 1 जुलैला सुरु झाली होती.

[amazon_link asins=’B07DNS3KCB,B07GLS2TRR’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’427035d1-bff6-11e8-83d9-e33fb213ef30′]