‘बिग बीं’ची नात नव्या नवेली आजीच्या निधनाने ‘इमोशनल’, मामा अभिषेकनं दिला ‘आधार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज कपूर यांची मोठी मुलगी रितू नंदा यांचं मंगळवारी कर्करोगाने निधन झालं. संपूर्ण कपूर आणि बच्चन कुटुंबाच्या उपस्थितीत नवी दिल्लीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांची नात नव्या नवेली नंदा फारच इमोशनल झाल्याचे दिसून आले. तिचा मामा अभिषेक बच्चन याने यावेळी तिला आधार देत तिचं सांत्वन केलं. नव्याचे अनेक फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे ज्यात ती रडत आहे आणि अभिषेक तिला सांभाळत आहे.

रितू नंदा यांना 2013 मध्ये कर्करोग झाल्याचं कळलं होतं. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. रणधीर कपूर यांनी एका मुलाखतीत रितु कर्करोगाशी लढा देत असल्याचा उल्लेख केला होता.

राज कपूर यांची मोठी मुलगी रितू यांना रणधीर, ऋषी आणि राजीव कपूर असे तीन भाऊ आणि रीमा जैन ही धाकटी बहिण आहे. रितूचा मुलगा निखील जैन याचं लग्न अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चनसोबत झालं आहे.

रितू नंदा यांच्याबद्दल बोलायचं झालं तर 30 ऑक्टोबर 1948 रोजी त्यांचा जन्म झाला होता. राजन नंदा यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या होत्या. श्वेता बच्चनचे सासरे आणि रितू यांचे पती राजन नंदा यांचं 2018 मध्ये निधन झालं होतं. रितू यांच्यानंतर 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे. मुलाचं नाव निखील तर मुलीचं नाव नताशा नंदा आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like