राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांचं खा. संजय राऊतांसाठी ‘खास’ ट्विट, म्हणाले…

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या नेक दिवसांपासून महाराष्ट्राला विश्वास बसणार नाहीत अशा गोष्टी वारंवार राजकीय वर्तुळात पहायला मिळाल्या. शिवसेनेने एवढ्या दिवसांची साथ सोडून भाजपला सत्तेपासून दूर ठेवले आणि काँग्रेस – राष्ट्रवादीशी हात मिळवणी केली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याने अनेक मोठे बदल पाहिले.

कधीकाळी सतत विरोधात भांडणाऱ्या पक्षातील नेते एकाच मंत्रिमंडळात काम करताना देखील आता महाराष्ट्र पाहतोय. त्यामुळे अनेकदा सभागृहात देखील राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शिवसेनेच्या नेत्यांची पाठराखण करताना पहायला मिळाले. नुकतेच राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी संजय राऊत यांना टॅग करत शायराना अंदाजात एक ट्विट केले आहे.

धीरे धीरे प्यार को बढाना हे प्यार मी हद से गुजर जाना हे असं मलीक यांनी संजय राऊत यांना म्हणत आगामी काळात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नाते आणखी घट्ट होणार असल्याचे जणू संकेतच दिले आहेत.

सध्या देशात नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे वातावरण तापत असताना शिवसेनेने लोकसभेत भाजपच्या बाजूने केलेल्या मतदानामुळे काँग्रेसने आपली तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेने संभ्रमाचे वातावरण तयार झाल्यामुळे नवाब मलिक यांनी अशा प्रकारचे ट्विट केल्याचे बोलले जात आहे.

कॉग्रेस खासदार राहुल गांधी यांनी देखील शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. जे लोक सरकारच्या या निर्णयाला पाठींबा देत आहेत ते संविधानाच्या मुळावर घाव घालताहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

काँग्रेसच्या हुसेन दलवाई यांनी या विधेयकावरून भाजपवर जोरदार टीका केली होती. भाजप देशात असलेली बेरोजगारी, आर्थिक मंदी, शेतकऱ्यांचे प्रश्न याकडे लक्ष द्यायचे सोडून समाजात तेढ निर्माण करण्याचा भाजपचा डाव असल्याचे दलवाई यांनी सांगितले. त्यातच शिवसेनेने देखील त्यांच्या बाजूने मतदान केल्याने दलवाई यांनी नाराजी व्यक्त केली होती.

आज राज्यसभेत विधेयक मांडले जाणार आहे त्यामुळे शिवसेना राज्यसभेत नेमकी काय भूमिका घेणार याकडे पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष लागून आहे. म्हंणूनच नवाब मलिक यांनी अशाप्रकारचे ट्विट केलेले असावे असा अंदाज वर्तवला जातोय.

Visit : policenama.com