Nawab Malik | आमदार नवाब मलिक यांचा मुलगा अडचणीत! पत्नीच्या व्हिसासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांचा मुलगा फिरोज मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आता नवाब कुटुंबियांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. व्हिसासाठी बनावट कागदपत्रे सादर करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मोहित कुंबोज यांनी आपल्या ट्वीटर वरून दिली. (Nawab Malik)
फिरोज मलिक यांच्यावर व्हिजासाठी अर्ज दाखल करतेवेळी बनावट कागदपत्रे सादर केली गेल्याचा आरोप आहे. मुंबई स्पेशल क्राईम ब्रँच २ यांच्याकडे व्हिसासंदर्भातील प्रकरणे येत असतात. याप्रकरणी दाखल तक्रारीवर छाननीदरम्यान कुर्ला पोलिसांच्या हाती मलिक यांचे नाव लागले आहे. तसेच याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात फिरोज मलिक यांना दुसरी बायको असल्याचा दावा करण्यात आला असून तिचे नाव लॉरा हॅमलिन असल्याचे सांगण्यात येत आहे.
तसेच त्या एक फ्रेंच नागरिक आहेत. लॉरा यांनी फिरोज यांना भेटण्यासाठी भारतीय व्हिजा मिळविण्यासाठी कागदपत्रे दाखल केली होती.
मात्र ज्यावेळी या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली त्यामध्ये असे आढळून आले की, या दोघांचे लग्न खोटे आहे.
याप्रकरणी मुंबई महापालिकेस देखील अधिक चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच व्हिसासाठी खोटी कागदपत्रे दाखल करण्यात आल्यामुळे नवाब मलिक (Nawab Malik) यांचे पुत्र
फिरोज मलिक यांच्याविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, माजी मंत्री नवाब मलिक हे मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अटकेत असून त्यातच आता फिरोज मलिक
यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे मलिक कुटुंबाच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे.
Web Title :- Nawab Malik | a case has been registered against nawab maliks son faraj malik
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Chandrashekhar Bawankule | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा ‘मविआ’ला टोला