Nawab Malik | राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिकांचा समीर वानखेडेंवर पुन्हा गंभीर आरोप, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणाला (Mumbai Cruise Drugs case) आता वेगळे वळण लागले आहे. मुख्य साक्षीदार किरण गोसावी (Kiran Gosavi) याच्या बॉडीगार्डने खळबळजनक आरोप केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे (NCB) अधिकारी समीर वानखेडें (Sameer Wankhede) यांच्यावर पुन्हा आरोप केले आहेत. तसेच नवाब मलिक (Nawab Malik) यांनी मुंबईत अंमली पदार्थ प्रकरणात जी कारवाई होत आहे, ती केवळ वसुलीच्या उद्देशाने केली जात असून या प्रकरणी आपण मुख्यमंत्री (CM) आणि गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.

गोसावीच्या बॉडीगार्डनेच आर्यन खान (Aryan Khan) अंमली पदार्थ प्रकरणी गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे हे षडयंत्र समोर आल्याचा दावा नवाब मलिक(Nawab Malik) यांनी केला आहे. क्रूझ ड्रग्स प्रकरणात श्रीमंतांना अडकवून वसुली केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ज्यांच्याकडून पैसे वसूल करण्यात आले आहेत, ते देखील याविषयी बोलतीलच, असंही मलिक म्हणाले.

Pune Crime | सावत्र मुलावर कोयत्याने सपासप वार करुन केला खून, फरार आरोपी बापाला 3 तासात ठोकल्या बेड्या

तोडपाणी करुन पैसे लाटण्याचा उद्योग

बोगस केसेस तयार करुन सेलेब्रिटी आणि श्रीमंतांना त्यात अडकवायचं आणि त्यांच्याकडून तोडपाणी करुन पैसे लाटायचे, असा उद्योग एनसीबीमधील (NCP) अधिकारी करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
बॉलिवूडमध्ये अंमली पदार्थ प्रकरणी (Bollywood drug case) गेल्या वर्षी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं.
मात्र, अद्याप एकालाही साधी अटक करण्यात आली नसल्याचे सांगत मलीक (Nawab Malik) यांनी पुन्हा एकदा समीर वानखेडेंवर टीकास्त्र सोडले.

एसआयटीची (SIT) मागणी

एनसीबी अधिकाऱ्यांकडून होणारी वसुली चिंतेची बाब असून गोसावी कोण आहे, संघटित गुन्हेगारी सुरु झाली आहे का, या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी एसआयटी (SIT) स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
परमबीर सिंह (Parambir Singh) सारखे लोक पुन्हा सक्रीय झाले असून त्यामुळे तोडपाण्याचे प्रकार वाढले असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.

हे देखील वाचा

Solapur Crime | दुर्दैवी ! जीममध्ये व्यायाम करताना डॉक्टरचा मृत्यू, सोलापूरच्या मोहोळमधील घटना

Aryan Khan Drugs Case | ‘किंग’ खान ‘शाहरूख’कडे 25 कोटींची मागणी ! 18 कोटींवर डील झाली; NCB च्या वानखेडेंना 8 कोटी द्यायचे असं बोलणं सुरु होतं, ‘त्या’ बॉडिगार्डचा दावा

Nagpur Crime | भाजप नगरसेवकाच्या घरातून चोरट्यांनी तिजोरी पळवली, 50 तोळे सोनं अन्…

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Nawab Malik | bogus drugs cases are made to trap celebrities and rich people blames on ncb  ncp leader nawab malik

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update