Nawab Malik | नवाब मलिकांना दिलासा ! ‘त्या’ दोन मागण्या कोर्टाकडून मान्य

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Nawab Malik | राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे 3 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. नवाब मलिकांना (Nawab Malik) ईडीने बुधवारी सकाळी सात वाजता चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेलं होतं. त्यानंतर त्यांनी दुपारी ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर त्यांना कोर्टात सुनावणी चालू झाली. या सुनावणीमध्ये नवाब मलिक यांना ईडीची कोठडी सुनावण्यात आली.

 

ईडीच्या (ED) कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांनी मुंबई सत्र न्यायालयाकडे (Court) काही मागण्या केल्या होत्या. यामधील 3 मागण्या न्यायालयाने मान्य केल्या आहेत. पहिली मागणी म्हणजे, ईडीच्या कोठडीत त्यांना घरचे जेवण देण्यात यावं. तर दुसरी मागणी, तपासावेळी त्यांच्या वकिलांना तेथे उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात यावी आणि तिसरी म्हणजे मलिकांना औषधांसाठी परवानगी मिळावी. या तिन्ही मागण्या कोर्टाने मान्य केल्या आहेत.

नवाब मलिकांना (Nawab Malik) अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे.
महाविकास आघाडीच्यावतीने आज मुंबईत धरणे आंदोलन करण्यात आलं होतं.
त्यासोबतच काल पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत मलिकांचा राजीनामा घेणार नसल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं.
दुसरीकडे भाजपने नवाब मलिक यांनी आपला राजीनामा द्यावा ही मागणी करत राज्यात अनेक ठिकठिकाणी आंदोलने केली आहेत.

 

दरम्यान, नवाब मलिक यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अन्यथा भाजपला (BJP) पुन्हा रस्त्यावर उतरावं लागेल,
अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली होती.

 

Web Title :- Nawab Malik | Consolation to Nawab Malik! ‘Those’ two demands were accepted by the court

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 60 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 25 हजार रोख आणि पोलीस चौकीसाठी प्रिंटरची लाच मागणाऱ्या 2 पोलिसांवर FIR; पुणे ग्रामीण पोलिस दलात खळबळ

 

Urfi Javed Hot Viral Video | सेक्सी बिकिनी घालून स्विमिंग पूल मधून बाहेर आली उर्फी जावेद, कॅमेरा पाहताच सुरू केला डान्स..!

 

Safe Investment Planning | ‘या’ स्कीममध्ये लावा केवळ 10,000 रुपये, मॅच्युरिटीनंतर होईल 16 लाखांचा फायदा, जाणून घ्या कसा?