Nawab Malik Daughter | ‘पेडलरची पत्नी म्हटले गेले, मुलांनी मित्र गमावले’, नवाब मलिकांच्या मुलीचे खुले पत्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  Nawab Malik Daughter | समीर खान (Sameer Khan) यांना 13 जानेवारीला एनसीबी (NCB) ने अटक केली होती. एनसीबीने दावा केला होता की, समीर खानने 194.6 किलोग्रॅम गांज्याच्या (cannabis) खरेदी-विक्रीचा कट रचला होता. समीर खान आणि 5 इतर लोकांना या प्रकरणात आरोपी बनवण्यात आले आहे (letter of Nilofar Khan-Malik, daughter of Nawab Malik, Minister of State and National Spokesperson of the Nationalist Congress Party ). राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांची कन्या नीलोफर (Nawab Malik Daughter) यांनी या पत्राला शीर्षक ’फ्रॉम द वाईफ ऑफ अ‍ॅन इनोसन्ट, द बिगनिंग’ दिले आहे. यामध्ये नीलोफर मलिक खान यांनी त्या रात्रीची आठवण मांडली आहे, जेव्हा त्यांचे पती समीर खान यांना नोर्कोटिक्स ब्यूरो (एनसीबी) ने अटक केली होती आणि त्यांनी या संकटाबाबत सांगितले आहे ज्यास त्यांचे कुटुंब अजूनही तोंड देत आहे.

 

नीलोफर (Nawab Malik Daughter) यांनी लिहिले आहे की, मला स्पष्ट आठवतेय की,
तो दिवस 12 जानेवारीचा होता जेव्हा माझे पती समीर खान यांना त्यांच्या आईचा फोन आला होता ज्यामध्ये सांगण्यात आले होते की, त्यांना दुसर्‍या दिवशी एनसीबीने त्यांच्या कार्यालयात बोलावले आहे.

 

जेव्हा समीर एनसीबी ऑफिसात पोहचले, तेव्हा त्यांनी पाहिले की, मोठ्या प्रमाणात मीडिया अगोदरच त्यांची प्रतीक्षा करत होती.
हैराण होऊन मी माझा हात खिडकीच्या काचेवर मारला, ज्यामुळे ती माझ्या पायावर पडली.
आणि माझ्या पायाला 250 टाके पडले, ते 15 तास माझ्यासाठी आणि माझ्या मुलांसाठी खुप त्रासदायक ठरले होते.

 

नवाब मलिक यांच्या मुलीने (Nawab Malik’s daughter) हा सुद्धा आरोप केला की, त्यांच्या पतीच्या अटकेपाठीमागे आणखी खुप काही कारणे आहेत.
त्यांनी दावा केला की, कोणतेही ठोस पुरावे नसतानाही समीर यांना अटक करण्यात आली. यामुळे आम्हाला प्रचंड धक्का बसला.
तेव्हा आम्हाला जाणवले की, हे व्यक्तीगत प्रकारे समीरपेक्षा काहीतरी जास्त आहे.
नीलोफर यांनी दावा केला आहे की, पुरावे नसतानाही अनेक महिने त्यांच्या पतीला जेलमध्ये ठेवण्यात आले.

नीलोफर यांनी पुढे म्हटले आहे की, दुसर्‍या दिवशी मला सिक्युरिटी गार्डकडून फोन आला की, आमच्या दरवाजावर एनसीबी अधिकारी आले आहेत.
त्यांना आमच्या घराची आणि कार्यालयाची तपासणी करायची आहे.
जोपर्यंत मी तिथे पोहचली, ते आमच्या कार्यालयात घुसले होते कारण गार्डकडे आणखी एक चावी होती.
नीलोफर खान (Nilofer Khan Malik) यांनी दावा केला की, सामान इकडे-तिकडे फेकल्यानंतर आणि दोन्ही ठिकाणी कसून तपास करूनही त्यांना काहीही मिळाले नाही.

 

नीलोफर यांनी आरोप केला की, आमच्या कुटुंबाला बहिष्कृत करण्यात आले आहे.
आमच्यासाठी ‘पेडलरची पत्नी’ आणि ’ड्रग तस्कर’ सारख्या शब्दांचा वापर केला गेला.
आमच्या मुलांनी मित्र गमावले. नीलोफरने ट्विटरवर हे खुले पत्र शेयर केले आहे.

 

Web Title : Nawab Malik Daughter | nawab malik daughter nilofer malik open letter over her husband sameer khan arrested by ncb

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Khadakwasla Dam | पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात 94.56 % पाणीसाठा

Ahmednagar Hospital Fire | अहमदनगर जिल्हा रुग्णालयात आग कशी लागली? समोर आली ‘ही’ महत्वाची माहिती; मुख्यमंत्र्यांचे सखोल चौकशीचे आदेश

Sierra Leone Blast | तेलाच्या टँकरमध्ये स्फोट ! 92 लोकांचा होरपळून मृत्यू, 100 हॉस्पिटलमध्ये दाखल (व्हिडीओ)