Nawab Malik | दाऊदची जमीन सनातन संस्थेनं खरेदी केली?; नवाब मलिकांच्या आरोपावरून सनातन संस्थेचं प्रत्युत्तर, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Nawab Malik | मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणानंतर (Mumbai Cruise Drugs Case) अनेक नवीन खुलासे समोर येताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांनी (Nawab Malik) एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मलिकांवर गौप्यस्फोट केला. फडणवीसांनी मलिकांचे 1993 बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती उघड केली. यानंतर मलिकांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.

 

नवाब मलिकांनी (Nawab Malik) फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देताना सनातन संस्थेचा (Sanatan Sanstha) उल्लेख केला आहे.
कोकणातील दाऊदच्या नावाची जागा सनातन संस्थेने घेतल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे.
या मलिकांच्या दाव्यावर आता सनातन संस्थेने सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. विशेष म्हणजे, असत्य माहितीच्या आधारे स्वतःची लंगडी बाजू सावरण्याचा त्यांचा प्रयत्न उघडा पडला आहे.
या संदर्भात सनातन संस्थेविषयी असत्य माहिती पसरवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याविषयी नाईलाजाने आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल, असा इशारा देखील सनातन संस्थेने मलिकांना दिला आहे.

 

सनातन संस्थेने (Sanatan Sanstha) म्हटलं आहे की, मुंबईतील ड्रग्ज प्रकरणात अत्यंत हीन पातळीचे राजकारण चालू आहे.
त्यातच आज नवाब मलिक यांनी स्वतःवर झालेल्या आरोपांच्या खुलाशासाठी सत्य जाणून न घेताच सनातन संस्थेच्या नावाचा विनाकारण वापर केला आहे.
दाऊदची कोणतीही मालमत्ता सनातन संस्थेने खरेदी केलेली नसून प्रत्यक्षात रत्नागिरीतील वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार ती मालमत्ता दिल्लीतील अ‍ॅड. अजय श्रीवास्तव यांनी खरेदी केलीय.
त्या ठिकाणी लहान मुलांवर संस्कार करण्यासाठी ‘सनातन धर्म पाठशाळा’ नावाने गुरुकुल चालू करण्याचे त्यांनी घोषित केले आहे.
सनातन संस्था आणि अ‍ॅड्. अजय श्रीवास्तव (Avd. Ajay Srivastava) यांचा कोणताही संबंध नाही, असं सनातन संस्थेने (Sanatan Sanstha) म्हटलं आहे.

तसेच, सनातन संस्थेने सांगितलं आहे, पुरेशी माहिती न घेताच सनातन संस्थेबाबत अशा प्रकारचे खोटे आरोप करून मलिक (Nawab Malik) यांनी स्वतःचे हसे करू नये.
सनातन संस्था आणि दाऊद यांची एकत्रित चर्चा करून समाजात हिंदु संस्थांविषयी अपसमज पसरवण्याची ही दुष्ट बुद्धी आहे.
या प्रकरणी नवाब मलिक यांना राज्य सरकारने (State Government) समज द्यावी अशी मागणी सनातन संस्थेने केलीय.
मलिक यांनी सनातन संस्थेचे नाव घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना बगल देण्याचा प्रयत्न केलाय.
प्रत्यक्षात त्यांच्यावर आतंकवादाच्या गुन्हेगारांकडून थेट जमीन घेतल्याचा आरोप झाला आहे.
तर मलिक ज्या दाऊदच्या जमिनीचा उल्लेख करत आहेत.
ती जमीन केंद्र सरकारने (Central Government) जप्त करून लिलाव केलेली आहे.
त्यामुळे अ‍ॅड्. श्रीवास्तव यांनीही ती दाऊदकडून घेतलेली नसून सरकारी लिलावाद्वारे खरेदी केले आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्यायला हवे. असं म्हटलं आहे.

 

Web Title : Nawab Malik | did sanatan sanstha buy dawood land sanatan sanstha answer allegations ncp minister leader nawab malik

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune ST Workers Strike | पुण्यातील शिवाजीनगरच्या वाकडेवाडीत ST कर्मचाऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन (व्हिडीओ)

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 43 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Faraz Malik | फडणवीसांच्या आरोपांवरून नवाब मलिकांच्या मुलाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले…