Nawab Malik Health | मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती खालावली, ICU मध्ये दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nawab Malik Health | राष्ट्रवादीचे नेते आणि मंंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांची प्रकृती (Nawab Malik Health) खालावली असून त्यांना जे. जे. रूग्णालयातील (J. J. Hospital) अतिदक्षता विभागामध्ये (ICU) ठेवण्यात आलं आहे. मलिक यांचा रक्तदाब (Blood Pressure) कमी झाला असून त्यांना पोटाच्या समस्येमुळं रूग्णालयात दाखल केलं गेलं असल्याची माहिती समजत आहे.

 

नवाब मलिक यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी मुंबईतील विशेष न्यायालयाला (Special Court) दिली आहे.
सोमवारी दुपारी कारागृहात कथितरित्या कोसळल्यानंतर नवाब मलिक यांना जे. जे. रुग्णालयात (J. J. Hospital) हलवण्यात आले असल्याचं त्यांच्या वकिलांनी सांगितले.
मंत्री नवाब मलिकांची प्रकृती ठिक नसल्याच्या कारणावरून त्यांच्या वकिलांकडून जामीन अर्ज (Bail Application) करण्यात आला मात्र ईडीने (ED) या जामीन अर्जाला विरोध केला आहे. (Nawab Malik Health)

 

नवाब मलिक यांना सकाळी 10 वाजता रूग्णालयात आणण्यात आलं. पोटाच्या समस्येमुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
त्यावेळी त्यांचा रक्तदाबही कमी झाला होता.
त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जे. जे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक संजय सुरासे (Sanjay Surase) यांनी दिली.

 

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून मलिक हे जामीनासाठी कोर्टात धाव घेत आहेत मात्र सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) त्यांची याचिका (Petition) स्वीकारण्यास नकार दिला,
तर पीएमएलए न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी 6 मे पर्यंत वाढवली, त्यामुळे मलिक आणखी अडचणीत आले आहेत.

 

Web Title :- Nawab Malik Health | ncp leader nawab malik serious in hospital says lawyer

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा