Nawab Malik In Dubai | वानखेडेंवर आरोप करणारे नवाब मलिक अचानकपणे दुबई दौऱ्यावर का गेले?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nawab Malik In Dubai | आर्यन खान प्रकरणानंतर (Aryan Khan Drugs Case) राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik In Dubai) हे चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसले. मागील काही दिवसांपासून मलिकांनी आरोपांचा सुरसपाटाच लावला आहे. आजही मलिकांनी समीर वानखेडेंवर (Sameer Wankhede) एक फोटो ट्विट करत सवाल उपस्थित केले आहेत. यामध्ये समीर वानखेडे मुस्लीम वेशात दिसून येत आहेत. पण, मलिकांनी हा फोटो जेव्हा टाकला, तेव्हा ते दुबईत असल्याची माहिती आहे. असं असताना मलिक थेट दुबईला (Dubai) का गेले? असा सवाल उपस्थित होतो आहे.

 

सर्वांना नमस्कार, तुम्हाला कळवतो की, मी आमच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व आवश्यक परवानग्या घेऊन दुबईला जात आहे, असं म्हणत नवाब मलिकांनी ही माहिती दिली आहे. मलिक यांनी दहशतवाद्यांशीच व्यवहार केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यामुळे ते जर विदेशात जाणार असतील तर त्यांच्यावरच्या या आरोपांनी पुन्हा तोंड वर काढलं असतं यात शंका नाही. तर, मलिक (Nawab Malik In Dubai) यांनी आपण दुबईला जात असल्याची घोषणा स्वत: केली आहे.

तसेच, सर्व सरकारी यंत्रणांनी माझ्यावर लक्ष ठेवावे आणि माझ्या हालचालींचा मागोवा घ्यावा ही विनंती,
असं त्यांनी यावेळी सांगितलं होतं. परंतु, या सर्व घडामोडी सूरू असताना ते अचानक दुबईत का गेले?
तर त्याचं कारण दुबई एक्सपो असल्याचं समजत आहे.
तसेच, दुबईमध्ये सुरू असणाऱ्या एक्सपो 2020 दुबई या कार्यक्रमासाठी ते दुबईत गेले असल्याचे समजते.

 

दरम्यान, अत्याधुनिक तंत्रज्ञान, आकर्षक आर्किटेक्चर, सांस्कृतिक कार्यक्रम आणि परस्परसंवादी प्रदर्शनांची विस्तृत श्रेणी ऑफर करून,
जगातील सर्व प्रगतीशील विचारांना एकाच ठिकाणी आणण्यासाठी हा एक्सपो आयोजित केला गेला असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे.
त्यामध्ये सहभागी होण्यासाठी मलिक (Nawab Malik In Dubai) दुबईला गेले आहेत.

 

Web Title :- Nawab Malik In Dubai | why did nawab malik suddenly go to dubai NCB officer sameer wankhede photo Aryan khan Drugs Case marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

PM Awas Rules | ‘पीएम आवास’चे नियम बदलले : करू नका ही चूक अन्यथा योजनेच्या लाभापासून राहाल वंचित

Google Latest Security Update | गुगलचं नवीन अपडेट, ‘या’ स्टेप्सने करा आपले Google अकाऊंट आणखी सुरक्षित

Sameer Wankhede | वानखेडे कुटुंबाचंही फोटोतून प्रत्युत्तर; म्हणाले – ‘आईसाठी मुस्लिम पद्धतीने लग्न, आम्ही धर्मनिरपेक्ष भावनेचं पालन करतो’