Nawab Malik In ED Custody | नवाब मलिकांना न्यायालयाचा दणका! सत्र न्यायालयाने मलिकांना सुनावली 9 दिवसांची ईडी कस्टडी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nawab Malik In ED Custody | राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक (Nawab Malik) केली. त्यानंतर त्यांना सत्र न्यायालयात (Sessions Court) हजर करण्यात आले. ईडी आणि नवाब मलिक यांच्या वकिलांनी न्यायालयात युक्तीवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून नवाब मलिक यांना 3 मार्च म्हणजे 9 दिवसांची ईडीची कस्टडी (ED Custody) देण्याचा निर्णय दिला. मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांची ईडीने 8 तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली. (Nawab Malik In ED Custody)

 

हे प्रकरण अंडरवर्ल्डशी (Underworld) संबंधित आहे, मनी लाँड्रिंगशी (Money Laundering) संबधीत आहे त्यामुळे या प्रकरणी अधिक चौकशी करण्यासाठी ईडीची कस्टडी मिळावी अशी मागणी ईडीकडून करण्यात आली होती.

 

 

य म्हणाले मलिक?
आपल्याला जबरदस्तीने अटक (Nawab Malik Arrest) करण्यात आली आहे.
या प्रकरणी कोणताही समन्स न देता आपल्याला या ठिकाणी आणण्यात आलं आणि सही घेण्यात आली असा आरोप (Allegations) मलिकांच्या वतीने सत्र न्यायालयात करण्यात आला.
आपल्यावर कोणत्या अधिकाराखाली कारवाई करण्यात आली आहे याचीही माहिती देण्यात आली नसल्याचं त्यांच्या वतीने कोर्टाला सांगण्यात आलं आहे.

ईडीचा युक्तिवाद
दाऊदची (Dawood Ibrahim) अनेक ठिकाणी बेनामी संपत्ती आहे. दाऊद हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी (International Terrorists) आहे.
हसिना पारकर (Hasina Parkar) आणि नवाब मलिक यांचा संबंध आहे. नवाब मलिकांचा संबंध थेट अंडरवर्ल्डशी आहे.
दाऊदशी संबंधित सात ठिकाणच्या संपत्तीचे मालक हे नवाब मलिक आहेत. डी गँगशी (De Gang) संबंधित संपत्ती मलिकांच्या कुटुंबियांनी खरेदी केली आहे.

 

अंडरवर्ल्डशी संबंध, त्याच्याशी संबंधित पैशाचा वापर करणे,
हा पैसा देशाबाहेर पाठवणाऱ्या कंपनीशी संबंध असणे या आरोपाखाली ईडीने मलिक यांना अटक केली आहे.
या प्रकरणी सर्व पुरावे न्यायालयात मांडण्यात आले आहेत. त्यानंतर सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला.

 

Web Title :- Nawab Malik In ED Custody | minority development minister nawab malik has been remanded in ed custody till 3rd of march

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune River Rejuvenation Project | मुळा- मुठा ‘नदी सुधार’ आणि ‘नदी काठ सुधार’ बाबत सत्ताधार्‍यांनाच संशय ! भाजप पदाधिकार्‍यांनीच ‘स्थायी समिती’ला दिलेल्या प्रस्तावामुळे चर्चेला उधाण

 

Chhagan Bhujbal After Nawab Malik Arrest | मलिकांचा गुन्हा सिद्ध झालेला नाही, त्यामुळे राजीनाम्याचा प्रश्नच नाही, छगन भुजबळांनी केलं स्पष्ट

 

Jayant Patil After Nawab Malik Arrest | नबाव मलिकांच्या अटकेनंतर जयंत पाटील यांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले – ‘2019 मध्ये माझ्यावरही…’