Nawab Malik | मलिकांच्या जामीन अर्जावर 15 जुलैपर्यंत उत्तर देण्याचे ED ला निर्देश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी (Financial Abuse Case) ईडीने (ED) अटक केली आहे. नवाब मलिक (Nawab Malik) यांनी नियमित जामिनासाठी विशेष न्यायालयात (Special Court) अर्ज केला असून त्यावर झालेल्या सुनावणीत या जामीन अर्जावर (Bail Application) 15 जुलैपर्यंत ईडीला उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे.

 

फेब्रुवारीमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी (Underworld Don Dawood Ibrahim) संबंधित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर मलिक यांनी पहिल्यांदाच विशेष न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज केला आहे. न्यायालयाने ईडीला मलिक यांच्या जामीन अर्जावर 15 जुलैपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले. प्रकृती आणि अन्य कारणासाठी मलिक यांनी यापूर्वी अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांना उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयात उपचार करण्याची मुभा विशेष न्यायालयाने दिली होती. मलिक यांच्याविरोधात ईडीने आरोपपत्र (Chargesheet) दाखल केले आहे.

 

दाऊद टोळीचे सदस्य हसीना पारकर (Hasina Parkar), सलीम पटेल (Salim Patel) आणि सरदार खान (Sardar Khan)
यांच्याशी संगनमत करून मलिक यांनी मुनिरा प्लंबरच्या (Munira Plumber) मालकीची गोवाला कंपाऊंडची (Goawala Compound) मालमत्ता हडपण्याचा कट रचला होता.
हे कृत्य आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायद्याअंतर्गत (पीएमएलए -PMLA) गुन्हा (FIR) आहे.
या गुन्ह्यात मलिक हे थेट आणि हेतूपूर्वक गुंतलेले असल्याचा दर्शवणारा हा प्रथमदर्शनी पुरावा असल्याचे न्यायालयाने आरोपपत्राची दखल घेताना म्हंटले आहे.

 

Web Title :- Nawab Malik | instructions to reply to ed on nawab maliks bail application deadline given till 15th july

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा