Nawab Malik | ‘भंगारवाला असल्याचा मला अभिमान’, असे छातीठोकपणे म्हणणाऱ्या नवाब मलिकांची संपत्ती किती? जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ड्रग्स प्रकरणावरुन (Drugs case) विरोधकांवर आणि एनसीबीवर (NCB) हल्लाबोल करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे मागील काही दिवसांपासून चर्चेत आले आहेत. नवाब मलिक (Nawab Malik) हे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर एकापाठोपाठ एक असे अनेक गंभीर आरोप करत आहेत. यानंतर राज्यात समीर वानखेडे विरुद्ध नवाब मलिक असे चित्र निर्माण झाले आहे.

 

नवाब मलिक यांच्याविषयी
नवाब मलिकांचा जन्म उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) आहे. त्यांचा जन्म 1959 साली बलरामपूरमधील उत्रौला तालुक्यातील धुसवा येथे झाला. नोंदीनुसार, ते संपूर्ण कुटुंबासह 1970 मध्ये मुंबईत (Mumbai) आले. त्यांनी अंजुमन हायस्कूलमधून (Anjuman High School) 10 वी आणि नंतर 1978 मध्ये बुरहानी कॉलेजमधून (Burhani College) 12 वी पर्यंतचे शिक्षण घेतले. नवाब मलिक (Nawab Malik) हे महाराष्ट्राच्या राजकारणात स्वच्छ प्रतिमेचे नेते म्हणून ओळखले जातात.

 

भंगारवाला असल्याचा अभिमान
भाजपचे नेते मोहित कंबोज (BJP leader Mohit Kamboj) यांनी मलिक यांच्याविरोधात नुकताच 100 कोटींचा दावा दाखल केला आहे. याबाबत त्यांना एका पत्रकार परिषदेत विचारले असता त्यावर त्यांनी 100 कोटीची माझी पात्रता तरी आहे का? असा प्रतिप्रश्न केला. तसेच माझी संपूर्ण संपत्ती विकली तरी 100 कोटी रुपये मिळणार नाहीत. माझा भंगाराचा धंदा (Scrap business) आहे आणि भंगारवाला असल्याचा मला अभिमान आहे. माझे कुटुंब आजही भंगाराचा व्यवसायात आहेत. यात लपवण्यासारखं काहीच नसल्याचे मलिकांनी म्हटले होते.

 

एवढी आहे संपत्ती
एका रिपोर्टनुसार, नवाब मलिक यांनी 1979 मध्ये पदवीच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. परंतु, ते शिक्षण पूर्ण करु शकले नाहीत. मलिक यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही. 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मलिक यांनी निवडणूक शपथपत्रात 5 कोटी 74 लाख 69 हजार रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. तसेच त्यांनी त्यांच्यावर 45 लाख रुपयांचे कर्ज असल्याचे दाखवले होते. याशिवाय नवाब मलिक आणि त्यांची पत्नी महजबीन मलिक यांची स्टील, हीरा डायमंड, मलिक इन्फ्रा यासह अनेक कंपन्यांमध्ये भागिदारी आहे.

काही एकर जमीन आणि फ्लॅट
नवाब मलिक यांच्या नावावर स्कोडा कारची नोंद आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावावर मारुती इर्टिका कारची नोंद आहे. तसेत त्यांची आणि त्यांच्या पत्नीची उत्तर प्रदेशातील बलरामपूर आणि महाराष्ट्रातील उस्मानाबाद (Osmanabad) येथे काही एकर शेतजमीन आहे. तसेच मलिक आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर मुंबईतील कुर्ला परिसरात एक-एक फ्लॅट आहे.

 

असे आहे कुटुंब
नवाब मलिक यांच्या कुटुंबात पत्नी महजबीन, मुलगा फराज, अमिर आणि मुलगी निलोफर आणि सना आहेत.
त्यांच्या जावयाचे नाव समीर खान (Sameer Khan) असून तो नीलोफरचा पती आहे.
मागील वर्षी अभिनेता सुशांत सिंह राजपूत खून प्रकरणानंतर (Sushant Singh Rajput murder case) समीर खान ड्रग्स प्रकरणात कारागृहात गेला होता.
नवाब मलिक यांचा एक मुलगा पेशाने वकील आहे. मलिक हे राष्ट्रवादीचे मुंबईचे अध्यक्ष आहेत.

 

शरद पवारांच्या अत्यंत जवळचे नेते
नवाब मलिक हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अत्यंत जवळचे नेते म्हणून ओळखळे जातात.
मात्र, त्यांचा इथपर्यंतचा प्रवास खूपच खडतर आहे.
मलिक यांनी 1996 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रातील नेहरु नगरमधून निवडणूक लढवली आणि ते आमदार झाले.
त्यानंतर 1999 आणि 2004 मध्ये त्यानी याच मतदारसंघातून विजय मिळवला.
2009 मध्ये अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून सलग चौथ्यांदा आमदार झाले.
मात्र 2014 च्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत ते पुन्हा पाचव्यांदा विजयी झाले.

 

Web Title :- Nawab Malik | know all about ncp leader leader and minister nawab malik and their property

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Corona | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 58 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Municipal Elections | …म्हणून महापालिकेच्या निवडणुका 2 महिने लांबण्याची शक्यता !

Bank Holidays | नोव्हेंबर महिन्यात बँकांना जास्त दिवस सुट्टी, ‘या’ कॅलेंडरच्या हिशेबाने करा प्लानिंग