Nawab Malik | मलिकांचा आणखी एक ट्वीट ‘बाॅम्ब’ ! केपी गोसावीचे WhatsApp चॅट्स समोर, वानखेडेंवरही आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Nawab Malik | मुंबई ड्रग्ज क्रूझ पार्टी प्रकरणावरुन (Mumbai Drugs Cruise Case) राज्यात गोंधळ उडाला आहे. यावरुन राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी (Nawab Malik) मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरही आरोप केले. तेव्हापासून त्यांच्या आरोपाच्या फै-या सुरूच आहे. मात्र, नवाब मलिक यांनी आणखी नवा गौप्यस्फोट केला आहे.

 

आर्यन खान प्रकरणाशी (Aryan Khan case) संबधित आणि सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या केपी गोसावी (KP Gosavi) याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स उघड केले आहेत.
मलिकांच्या (Nawab Malik) या नव्या खळबळजनक आरोपाने या प्रकरणाला आणखी नवं वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मलिक म्हणाले, ‘केपी गोसावी आणि माहिती देणारा व्यक्ती कॉर्डिलिया क्रूझवरील पार्टीत ठराविक लोकांना अडकवण्यासाठीचं प्लानिंग करत असल्याचं या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधून उघड होत आहे.
ही समीर दाऊद वानखेडे यांची प्रायव्हेट आर्मी आहे आणि याची उत्तरं त्यांना द्यावीच लागतील’, असं ट्विट मलिक यांनी केलं आहे.

 

तसेच, कॉर्डिलिया क्रूझवर उपस्थित एक व्यक्ती सर्व माहिती केपी गोसावी (KP Gosavi) याला व्हॉट्सअ‍ॅपद्वाे देत असल्याचं या चॅट्समधून समोर येत आहे.
यामध्ये केपी गोसावी क्रूझवर उपस्थित असलेल्यांचे फोटो आणि त्यांची माहितीची विचारणा करत आहे.
त्याचबरोबर आपल्यासोबत एनसीबीचे 35 अधिकारी आहेत आणि त्यांना अचूक माहिती हवी असल्याचंही तो म्हणत आहे.
केपी गोसावी वारंवार संबंधित व्यक्तीकडे फोटो पाठवण्याची मागणी करत आहे. जेणेकरुन कारवाई करणं सोपं होईल.

गोसावी याने समीर वानखेडे यांना ओळखत नसल्याचा दावा केला होता. आणि त्याच्यावर करण्यात आलेले खंडणीचे आरोपही त्याने फेटाळून लावले होते.
परंतु, आता या व्हॉट्सअ‍ॅप चॅट्समुळे प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता दिसत आहे.
दरम्यान, मलिकांनी ट्वीट करुन माहिती दिलेल्या चॅट्सची सत्यता पडताळली नाही. मात्र, त्यांनी केलेल्या गंभीर आरोपामुळे सर्वत्र चर्चा होत आहे.

 

Web Title : Nawab Malik | nawab malik tweets kp gosavi whatsapp chats allegations sameer wankhede

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | लॉकडाऊनमध्ये कंपनीत राहतो असे सांगून दुसर्‍या महिलेबरोबर अनैतिक ‘संबंध’

EPS-95 अंतर्गत अनाथ मुलांना सुद्धा मिळते पेन्शन, EPFO ने सांगितले त्यांना केव्हापर्यंत मिळत राहील आर्थिक मदत?

Dilip Walse Patil | गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची मोठी घोषणा; म्हणाले – ‘शहीद पोलिसांच्या कुटुंबियांना 5 एकर जमीन देणार’