Nawab Malik | ”आ रहा हूँ मै..’,’ फडणवीसांनी केलेल्या गंभीर आरोपांवरुन नवाब मलिकांचं उत्तर (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nawab Malik | माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (मंगळवारी) एक पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये फडणवीसांनी राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर मोठा गौप्यस्फोट केला आहे. दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. यानंतर त्यांनी बॉम्ब फोडत नवाब मलिक यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. यावरून नवाब मलिक यांनी ट्वीटच्या माध्यमातून फडणवीसांना उत्तर दिलं आहे.

नवाब मलिक (Nawab Malik) यांनी म्हटलं आहे की, आ रहा हूँ मै, असे ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांना पत्रकार परिषदेमधून प्रत्युत्तर देण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर नवाब मलिक काय बोलतात आणि फडणवीसांना (Devendra Fadnavis) काय प्रत्युत्तर देतात. याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या आरोप-प्रत्यारोपामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चासत्र रंगल्या आहेत.

काय म्हणाले फडणवीस?

मुंबईतील 1993 बॉम्बस्फोटातील आरोपींकडून मंत्री नवाब मलिकांनी (Nawab Malik) कुर्ला येथे जमीन खरेदीचा व्यवहार केला होता.
बॉम्बस्फोटातील आरोपींविरोधात टाडा लागला होता.
टाडा लागलेल्या आरोपीची संपत्ती जप्त केली जाते.
त्यामुळे ही मालमत्ता जप्त होऊ नये म्हणून मलिकांनी कमी किंमतीत ही जागा खरेदी केली का? 2003 मध्ये मलिक मंत्री होते. मलिकांचा थेट अंडरवर्ल्डशी संबंध होते.
1993 च्या बॉम्बस्फोटात अनेक निष्पापांचे बळी गेले.
ज्या लोकांनी स्फोट घडवले. रेकी केली या लोकांसोबत जमीन व्यवहार करण्यामागे काय हेतू होता? असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | ‘नवाब मलिकांच्या कुटुंबियांनी कुर्ल्यात 3 एकर संपत्ती अंडरवर्ल्डच्या गुंडाकडून केली खरेदी’ – देवेंद्र फडणवीस (व्हिडीओ)

Shiv Sena MP Vinayak Raut | ‘राणेंसारख्या गद्दाराची सिंधुदुर्गात डाळ शिजणार नाही’ – विनायक राऊत (व्हिडीओ)

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Nawab Malik | NCB leader nawab maliks four word tweet serious allegations made bjp leader devendra fadnavis said i am coming

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update