Nawab Malik | समीर वानखेडे चैत्यभूमीवर पहिल्यांदा दिसले, नमाजाला मात्र नियमित दिसायचे; नवाब मलिकांचा वानखेडेंवर निशाणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जातीच्या मुद्यावरुन एनसीबीचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांच्या (Nawab Malik) रडारवर आहेत. आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त (mahaparinirvan din) समीर वानखेडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आले होते. परंतु भीमशक्ती रिपब्लिकन सेनेने वानखेडेंच्या उपस्थितीवर आक्षेप नोंदवला. त्यांना चैत्यभूमीवर (Chaityabhoomi) येण्याचा नैतिक अधिकार नाही अशी भूमिका भीमशक्ती रिपब्लिकन सेनेनं (Bhimashakti Republican Army) घेतली. यानंतर नवाब मलिक (Nawab Malik) चैत्यभूमीवर आल्यानंतर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला.

 

नवाब मलिक (Nawab Malik) यांनी म्हटले की, बाबासाहेबांना अभिवादन करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. अभिवादन करणारे एखाद्या धर्माचे, समाजाचे असं म्हणणं चुकीचं आहे. आम्ही दरवर्षी इथे येतो. काही लोकांनी येणं सुरु केलं आहे हे चांगलं आहे. मी जो संघर्ष सुरु केला त्याचा जय भीम इम्पॅक्ट सुरु झाला आहे, असं वाटतं. समीर वानखेडे याआधी चैत्यभूमीवर आल्याचं पाहिलं का? या प्रश्नावर बोलताना त्यांना त्याबद्दल माहिती नाही, पण माझ्यासोबत नियमितपणे नमाज पठण करायचे हे खरं आहे, असा टोला मलीक यांनी लगावला.

भीमसैनिकांचा वानखेडेंच्या येण्यावर आक्षेप
मागील अनेक दिवसांपासून वादात असलेले एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे हे देखील चैत्यभूमीवर दाखल झाले होते.
यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
परंतु यावेळी तेथून बाहेर पडताना त्यांच्या विरोधक आणि समर्थकांमध्ये वाद झाल्याचे पहायला मिळालं.
समीर वानखेडे अभिवादन करुन बाहेर येताना भीमसैनिकांनी त्यांच्या चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येण्याकरता आक्षेप घेतला.
त्यामुळे काही काळासाठी वाद निर्माण झाला. यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

 

वानखेडेंना अभिवादन करण्याचा नैतिक अधिकार नाही
भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष दगडू कांबळे (Dagdu Kamble)
यांनी समीर वानखेडे यांच्या उपस्थितीवर आक्षेप नोंदवताना म्हटले की, समीर वानखेडे यांना बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा नैतिक अधिकार नाही.
जर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायचं असेल तर त्यांच्या विचारधारेवर चाललं पाहिजे.
समीर वानखेडेंना आज चैत्यभूमीवर येण्याची गरज का भासली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

 

Web Title :- Nawab Malik | ncp leader and minister nawab malik allegation on sameer wankhede in mahanirvan din at dadar mumbai chaityabhoomi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Parambir Singh | परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा ! आरोपपत्र दाखल न करण्याचे मुंबई पोलिसांना आदेश

Post Office Scheme | विना जोखीम बँकेपेक्षा सुद्धा जास्त मिळवायचा असेल FD वर रिटर्न, तर Post Office मधून मिळवू शकता जास्त नफा! जाणून घ्या कसा?

Narayan Rane | ‘देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे केंद्रीय मंत्री झालो’ – नारायण राणे