Nawab Malik | ‘राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधून ‘BJP’ मध्ये गेलेले नेते घरवापसी करण्याच्या तयारीत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Nawab Malik | केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मार्चमध्ये महाराष्ट्रात भाजपचं (BJP) सरकार येणार असं मोठं विधान केलं. यापुर्वीही काही भाजप नेत्यांकडून असं वक्तव्य करण्यात आलंय. राणेंनी केलेल्या विधानानंतर कालंच अमित शहा (Amit Shah), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांचा एकत्रित फोटोही व्हायरल झाला. यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं. यावर राष्ट्रवादीने (NCP) स्पष्टीकरण देत तो फोटो मॉर्फ केलेला असल्याचं सांगितलं. दरम्यान, आता राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी मोठं विधान केलं आहे.

 

नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले, ‘महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government)
पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार तसेच भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांची पुन्हा घरवापसी होणार असल्याचंही म्हटलं आहे.
तसेच, शरद पवार, प्रफुल्ल पटेल हे काल दिल्लीला पार्लमेंटच्या डिफेन्स कमिटी मीटिंगसाठी गेले होते.
दरम्यान, नारायण राणे यांचं वक्तव्य आलं की, मार्च महिन्यात आम्ही सरकार बनवणार.
राणे यांच्या वक्तव्यानंतर एक पॉर्फ फोटो सोशल मीडियात व्हायरल करण्यात आली.
ज्यात अमित शहा शानमध्ये बसले आहेत आणि शरद पवारांचा ज्या प्रकारे फोटो दाखवण्यात आला आहे तो अपमानित करण्यासाठी मॉर्फ फोटो होता.
भाजपच्या आयटी सेलचा फर्जीवाडा जास्त वेळ चालणार नाही.’ असं ते म्हणाले.

पुढे नवाब मलिक म्हणाले, ‘सरकार 5 वर्षे पूर्ण करणार, देवेंद्रजी वारंवार भविष्यवाणी करत येत आहे. चंद्रकातं पाटील स्वप्न पाहून उठत राहिले.
आता नारायण राणे..,1999 मध्ये मुख्यमंत्रिपद गेलं आणि त्या पदासाठीच ते काँग्रेसमध्ये आले. त्यानंतर भाजपात (BJP) आले.
त्यानंतर ते प्रत्येक वर्षी नवस करत आहेत. बोकड, कोंबड्या कापण्याचा प्रकार ते करत आहेत पण, अजूनही नवस पूर्ण झालेला नाही.
त्यांनी लक्षात घ्यावं ही सरकार दिवसेंदिवस भक्कम होत चाललेले आहे,’ असंही मलिक यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, पुढे मलिक (Nawab Malik) म्हणाले, ‘त्यांना हे ही सांगतो लवकरच भाजपमध्ये (BJP) असणारे अनेक आमदार आता पुन्हा स्वगृही परतणार आहेत.
भाजप हताश आहे. राष्ट्रवादी (NCP), काँग्रेसमधून (Congress) भाजपमध्ये जे गेले होते ते आता घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत.’ असं ते म्हणाले.

 

Web Title :  Nawab Malik | NCP leader and minister nawab malik claimed that leaders who join bjp from congress ncp are preparing to return home

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Life Certificate | पेन्शनर्ससाठी मोठी खुशखबर ! ‘या’ महत्वाच्या कागदपत्राबाबत मिळाला मोठा दिलासा

7th Pay Commission | मोठी बातमी ! महागाई भत्त्याच्या कॅलक्युलेशनचा बदलला फार्म्युला! जाणून घ्या आता किती मिळेल सॅलरी

Nawab Malik | ‘अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचे कटकारस्थान सुरू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे तक्रार करणार’ – नवाब मलिक