Nawab Malik | ‘देवेंद्र फडणवीस टीका करतात तेव्हा चमत्कार घडतो, 2024 मध्ये देखील…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शरद पवार (Sharad Pawar) यांचे राजकारण संपले आहे असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलले होते त्यावेळी चमत्कार (Miracles) घडला होता आणि आताही ते टीका करत आहेत. देवेंद्र फडणवीस टीका करतात त्यावेळी चमत्कार घडतो. त्यामुळे 2024 मध्येही चमत्कार घडवून आणू, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला नवाब मलिक (Nawab Malik) यांनी प्रत्युत्तर दिले.

 

शरद पवार यांच्या वाढदिवसादिवशी भाजप नेते (BJP leader) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा देताना, त्यांना पंतप्रधानपदावरुन (PM) टोला लगावला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून पंतप्रधानपदाचं स्वप्न (Dream) पाहत आहेत. पण स्वप्न पाहायला कुणालाही बंदी नाही. त्यांचा पक्ष दहा खासदारांच्या संख्येच्या पलीकडे जाऊ शकला नाही. त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा असा टोला फडणवीस यांनी लगावला होता.

देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले,
जेव्हा देवेंद्र फडणवीस तुम्ही शाळेत होतात त्यावेळी 1984 साली लोकसभेच्या निवडणुकीत (Lok Sabha election) भाजपची संख्या दोनवर गेली होती.
तुमचे खासदार (MP) डबलसीट सायकलवरुन संसदेत जात होते हे विसरला आहात, असा टोला मलिक यांनी लगावला आहे.

 

ही लोकशाही आहे अमृत पिऊन कुणी सत्तेत बसत नाही हे देवेंद्र फडणवीस तुम्हाला कळलं पाहिजे असेही नवाब मलिक यांनी म्हटले.
शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस हे पंतप्रधान होतील असा कुठलाही दावा केलेला नाही.
उलट ते देशातील सर्व राजकीय पक्षांना एकत्र करण्यासाठी काम करत आहेत.
विरोधकांच्या एकीमुळे मोदी सरकार (Modi government) सत्तेबाहेर जाईल असेही मलिक म्हणाले.

 

Web Title :- Nawab Malik | ncp leader and minister nawab malik criticizes bjp devendra fadnavis after his statement on sharad pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Urfi Javed | उर्फी जावेद ट्रॉलर्सना म्हणाली – ‘मी जावेद अख्तरची नात नाही आणि मी ‘इस्लाम’चं आचरण करत नाही, पण तुम्ही…’

 

Easy Way to Protect Omicron | भारतीय तज्ज्ञांनी सांगितली कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनपासून बचावाची सर्वात सोपी पद्धत, जाणून घ्या

 

Bhasha Sangam Mobile App | मोबाईलमधून ‘मोफत’ शिकू शकता देशातील 22 वेगवेगळ्या भाषा, टेस्ट पास झाल्यावर सरकारकडून मिळेल ‘प्रमाणपत्र’