Nawab Malik | आर्यन खानच्या जामिनावर नवाब मलिक यांची प्रतिक्रिया; म्हणाले -‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त…’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  आर्यन खान ड्रग्स प्रकरण (Aryan Khan Drug Case) बोगस असल्याचा सुरुवातीपासूनच दावा करणारे आणि एनसीबीचे (NCB) संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याविरोधात आघाडी उघडणारे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) आजच्या निर्णयावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे. वानखेडे यांच्या विरोधात लढाई सुरुच राहणार असल्याचे संकेत नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ट्विटच्या माध्यमातून दिले आहेत.

‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त…’ असं सूचक ट्विट नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आर्यन खानच्या जामिनाचा (Bail) निर्णय आल्यानंतर केलं आहे.
त्याशिवाय, व्हिडीओच्या माध्यमातूनही त्यांनी प्रतिक्रीय दिली असून समीर वानखेडे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

अटक करण्यापूर्वी 72 तासांची नोटीस

 

नवाब मलिक म्हणाले, ज्या समीर वानखेडे यांनी क्रूझ प्रकरणात या मुलांना तुरुंगात टाकलं, तेच आता घाबरले आहेत.
या प्रकरणाची चौकशी सध्या महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) करत आहेत. ती सीबीआयकडे (CBI) किंवा एनआयएकडं (NIA) द्यावी, अशी मागणी त्यांनी कोर्टात केली होती.
हायकोर्टानं त्यांना अटकेपासून संरक्षण देऊन ही याचिका निकाली काढली. अटक करण्याआधी त्यांना 72 तासांची नोटीस दिली जाईल, असं मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कोर्टात स्पष्ट केलंय.

 

वानखेडेंना पोलिसांची भीती वाटतेय

 

लोकांना तुरुंगात टाकणारे आता स्वत: तुरुंगात जाण्यापासून घाबरत आहेत. जो बोगस कारभार ह्यांनी केलाय, तो हळूहळू समोर येऊ लागला आहे.
काही दिवसांपूर्वीच याच समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली होती. आता त्याच पोलिसांची भीती वानखेडेंना वाटतेय.
जे कारनामे त्यांनी केलेत, त्याचीच भीती त्यांना सतावत आहे, असा हल्ला नवाब मलिक यांनी चढवला आहे.

 

आर्यनची आजची रात्र तुरुंगातच

 

क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणी अटकेत असलेल्या बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खानला अखे मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिला आहे.
आर्यन खान प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून त्याला जामीन मंजूर झाला आहे.
निकालाची प्रत उद्या येणार असल्याने आजची रात्र आर्यन खानला तुरुंगात काढावी लागणार आहे. आर्यन उद्या तुरुंगाच्या बाहेर येण्याची शक्यता आहे.

 

Web Title : Nawab Malik | ncp leader and minister nawab malik reaction on aryan khan bail

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Supreme Court | लवकरच लागणार NEET चा निकाल; उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केला रद्द

Gold Price Today | 2 दिवसानंतर सोने पुन्हा वधारले, जाणून घ्या आजचे नवीन दर

CM Uddhav Thackeray | ‘लोकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करावा यासाठी केंद्र सरकारकडून इंधन दरवाढ’