ताज्या बातम्यामुंबई

Nawab Malik | ‘अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचे कटकारस्थान सुरू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे तक्रार करणार’ – नवाब मलिक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nawab Malik | राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे एनसीबीचे (NCB) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर सतत आरोप करताना दिसले. या आरोपांच्या सत्रामुळे राज्यात खळबळ उडाली. तर, मलिकांनी आणखी एक वेगळंच ट्विट केलं आहे. ‘आपल्या घरावर कुणीतरी पाळत ठेवत असल्याचा दावा केला आहे. तर, आपल्याला सुद्धा अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या प्रमाणे अडकवण्याचं कटकारस्थान सुरू असल्याचा खळबळजनक दावा मलिक यांनी केला आहे.

 

नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज (शनिवारी) पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना मलिक म्हणाले, ‘ज्या प्रमाणे मी 2 महिन्यांपासून चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली, त्यानंतर मला माहिती मिळण्यास सुरुवात झाली की, तुमचे कार्यालय, घर, नातवंड कुठे शिक्षण घेतात याची माहिती घेत आहेत. जेव्हा मी परदेशच्या दौऱ्यावर होतो तेव्हा काहींनी दोघांना पकडले, जे नागरिक फोटोज क्लिक करत होते. जेव्हा या दोघांना पकडलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही घाबरलो होतो म्हणून पळालो. तर, गेले 2 महिने मला काही लोकं माहिती देत होते की, काही पक्षाचे कार्यकर्ते माझ्या घराची आणि ऑफिसची माहिती घेताहेत. माझ्या नातवांचीही माहिती घेण्यात येत आहेत. ते कुठं शाळेत जातात यावर देखील त्यांचं लक्ष आहे. मी दुबईला असताना दोघे माझ्या घरचे फोटो काढत आहेत. हे करत असताना स्थानिक नागरिकांनी त्यांना पकडलं. असं मलिक म्हणाले.

 

पुढे नवाब मलिक म्हणाले, ‘कारमध्ये बसलेला व्यक्ती, गाडीचा नंबर सुद्धा समोर आला आहे. आम्ही या संदर्भातील तक्रार मुंबई पोलिसांत करणार आहोत आणि चौकशी करण्याची मागणी करणार आहे. या षडयंत्रामागे कोण आहे याची माहिती समोर यायला हवी. अनेक षडयंत्र माझ्याविरोधात झाले आहेत. या संदर्भातील अनेक पुरावे माझ्याकडे आहेत आणि त्याबाबतही मी पोलिसांना माहिती देईल. मला वाटतं की, अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना ज्या प्रमाणे अडकवलं जात आहे त्याचप्रमाणे आता काही जण माझ्याविरोधात षडयंत्र करत आहेत.

‘मी घाबरतो किंवा मला सुरक्षा हवी आहे असं नाहीये. मी कुणालाही घाबरणार नाहीये.
कुणालाही रेकॉर्डसाठी फोटो हवे असतील तर ते गुगलवर उपलब्ध आहेत. पण रेकी केली जात आहे.
देशमुखांच्या विरोधात ज्याप्रमाणे खोटी तक्रार करुन त्यांच्या विरोधात कारवाई सुरू झाली.
त्याचप्रमाणे केंद्रीय यंत्रणेचे अधिकारी माझ्याविरोधात मसूदा तयार करुन नागरिकांना पाठवत आहेत.
तसेच माझ्याविरोधात खोट्या तक्रारी करायला सांगत आहेत,’ असाही आरोप मलिकांनी (Nawab Malik) केला.

 

दरम्यान, ‘या संदर्भातील मी मुंबई पोलीस आयुक्त (Mumbai Police Commissioner) आणि
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांना पत्र लिहणार आहे.
राज्यातील एका मंत्र्याला खोट्या तक्रारी करुन अडकवण्याचा जर डाव असेल.
एक अनिल देशमुख झाले इतरही लोक अनिल देशमुख (Anil Deshmukh) होतील हा यांचा गैरसमज आहे.
कारवाई केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही,’ असं देखील मलिक यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Nawab Malik | NCP leader and minister nawab malik said conspiracy against me like anil deshmukh will complain to home minister amit shah about it

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Katrina Kaif | ‘या’ अभिनेत्याचा वाईट वागणुकीमुळं सलमान खान समोर रडली कतरिना, जाणून घ्या कोण होता तो अभिनेता?

Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांनी ‘या’ स्टॉकमधून 1 आठवड्यात गमावले 753 कोटी रुपये; तुम्ही तर घेतला नाही ना?

LPG Cylinder Booking | गॅस सिलेंडर बुक करण्यास विसरलाततर नो-टेन्शन; कंपनी पाठवेल ‘अलर्ट’, जाणून घ्या

Back to top button