Nawab Malik | नवाब मलिकांना दिलासा नाहीच, सुनावली ‘एवढ्या’ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते (NCP) नवाब मलिक (Nawab Malik) यांना न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. नवाब मलिक (Nawab Malik) यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) देण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडी मिळताच नवाब मलिकांची रवानगी आता आर्थर रोड कारागृहात (Arthur Road Prison) होणार आहे.

मुंबई सत्र न्यायालयातील (Mumbai Sessions Court) विशेष पीएमएलए कोर्टानं (Special PMLA Court) नवाब मलिक (Nawab Malik) यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांना 21 मार्चपर्यंत कारागृहात ठेवण्याचे निर्देश कोर्टानं दिले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी (Money Laundering Case) नवाब मलिक यांची रिमांडमधील चौकशी पूर्ण झाल्याची माहिती ईडीने (ED) PMLA कोर्टात दिली.

 

दाऊद इब्राहिमशी (Dawood Ibrahim) संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना 9 तास चौकशी केल्यानंतर अटक (Arrest) करण्यात आली होती.
ईडीनं मलिक यांना 23 फेब्रुवारीला मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती.
त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली.
ही कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले.
तेव्हा त्यांना पुन्हा न्यायालयाने 7 मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. आज मलिक यांना पुन्हा हजर करण्यात आले.

मलिक यांच्या वकिलांनी न्यायालयीन कोठडीला विरोध केला. ईडीने कारवाईला हायकोर्टात (High Court) दिलेलं आव्हान प्रलंबित असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला होता.
परंतु रिमांडमधील चौकशी पूर्ण झाल्याचं सांगत ईडीने त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली आणि त्यासाठी पीएमएलए कोर्टानं मंजुरी दिली आहे.

 

Web Title :- Nawab Malik | ncp leader and minister nawab malik sent to judicial custody by special pmla court in mumbai

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा