Nawab Malik | नवाब मलिकांचा आणखी एक गौप्यस्फोट ! माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला ‘हा’ गंभीर आरोप (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नीरज गुंडे (Neeraj Gunde) हा मागील सरकारचा दलाल आहे, हा दलाल माझ्यावर आरोप करतोय. ज्याच्या चेंबूरच्या घरी माजी मुख्यमंत्री जाऊन बसायचे. ज्याला मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये थेट जायला मिळायचं. सगळ्या विभागाच्या सेक्रेटरींच्या ऑफिसमध्ये याचं जाणं येणं होतं. वर्षावर हा कायम फिरकत असायचा. रश्मी शुक्लाच्या (IPS Rashmi Shukla) प्रकरणात देखील गोंधळ घालत होता. महापालिकेत (BMC) वारंवार जात होता. हाच दलाल आता समीर वानखेडे (NCB Officer Sameer Wankhede) यांच्या कार्यालयात जाऊन तासनतास बसत असतो. हा तिथ का बसत असतो? त्याच्या मागे एक कारण आहे. कारण काशिफ खान (Kashif Khan), मोहित कंबोज (Mohit Kamboj), कॅडियल क्रूझ ( Cadial Cruise) याचा एकमेकांशी संबंध आहे, असे राष्ट्रवादीचे नेते (NCP) नवाब मलिक (Nawab Malik) यांनी सांगितले. तसेच ही बाब मी लवकरच समोर आणणार आहे. यानंतर भाजपच्या लोकांना राज्यभरात तोंड दाखवायची लायकी उरणार नाही, अशा शब्दात नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज (रविवार) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि नीरज गुंडे यांच्यावर हल्लाबोल केला.

Pune Accident | दुर्दैवी ! बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

नवाब मलिक पुढे म्हणाले, नीरज गुंडे हा चोर आहे. तो कुणाचे पैसे कुठे लपवतो हे मला माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मी माध्यमांमध्ये विविध विषयांवर बोलत होते, म्हणून मला कशाप्रकारे त्रास देता येईल, याचा प्रयत्न केला. माझ्या मुलाने जी जागा कुर्ल्यात खरेदी केली होती त्यावेळी जाणीवपूर्वक त्यावर आरक्षण (Reservation) टाकलं. आम्हाला ती डेव्हलप करता येत नाही. त्यांना एवढंच सांगणं आहे की, किती आरोप तुम्हाला करायचे असेल तर करा. आम्ही कुणाचे पैसे घेतलेले नाहीत. उलट त्या कंपनीमध्ये मोहिज कंबोज याचा मूनभाई आगीचा नावाचा एक नातेवाईक होता. साडे तेरा कोटी रुपये त्याने घेतले आहेत. मोहित कंबोज चोर आहे, त्याचा नातेवाईक देखील चोर आहे आणि खापर माझ्यावर फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे मलिक (Nawab Malik) म्हणाले.

समीर वानखेडे जन्मापासून मुस्लिम

नवाब मलिक यांनी शनिवारी एका व्यक्तीचा फोटो ट्विट केला होता. याबाबत बोलताना ते म्हणाले की, समीर वानखेडे याच्या मेहुण्याचा मी काल फोटो ट्विट केला आहे. सध्या तो व्हेनिसला राहतो. तो मुस्लिम आहे. त्याचा फोटो ट्विट करण्याच कारण असं होतं की काल राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची (National Backward Classes Commission) वानखेडे यांनी भेट घेतली. मी मझ्या मतावर ठाम आहे की समीर वानखेडे जन्मापासून मुस्लिम (Muslim) आहे. त्यांच्या कुटुंबातील सर्वजण मुस्लिम होते.

Mumbai Local Train | मुंबईकरांची लोकल प्रवासकोंडी दूर होणार, ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय

वानखेडेंनी आपली आयडेंटिटी लपवली

वानखेडे यांच्यावर आरोप करताना मलिक म्हणाले, बोगस दाखल्यावर ही नोकरी घेण्यात आली.
2015 पासून वानखेडे यांनी आपली आयडेंटिटी लपवली.
म्हणजे दाऊद वानखेडे (Dawood Wankhede) यांनी डी के वानखेडे नाव लिहिलं.
आता ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhede) लिहायला सुरुवात केली.
आपली आयडेंटिटी ओपन होईल यासाठी वनखेडे यांनी घटस्फोट दिला.

दिवाळीनंतर भाजपचा भांडाफोड

यावेळी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलेल्या ट्विटचा समाचार नवाब मलिक यांनी घेतला.
दिवाळीनंतर भाजपचा (BJP) भांडाफोड मी करणार आहे.
त्यानंतर मात्र भाजपवाले राज्यात कुठेही तोंड दाखवू शकणार नाहीत.
पोकळ धमक्यांना मी घाबरत नसल्याचे मलिक यांनी सांगितले.

हे देखील वाचा

Pune Crime | आर्यन खान ड्रग्ज केसमधील NCB चा पंच किरण गोसावीवर फसवणूकीसह पिस्तुल दाखवून धमकाविल्याचा गुन्हा दाखल

Aryan Khan Drugs Case | आर्यन खान मन्नतवर पोहचला पण ‘या’ कारणामुळं मुनमुन धमेचा तुरूंगातच अडकली, जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Nawab Malik | NCP Leader and Minister nawab malik slams bjp leader devendra fadnavis and ncb officer sameer wankhede

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update