Nawab Malik | ‘राणेंसारखे भित्रे लोक आता मंत्रिमंडळात राहिले नाहीत’, नवाब मलिकांचा राणेंवर हल्लाबोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर निशाण साधला होता. यानंतर आता नवाब मलिक यांनी नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नारायण राणेंसारखे भित्रे लोक आता मंत्रिमंडळात राहिले नाहीत. राणे घाबरले म्हणून त्यांनी पक्ष प्रवेश केला… आता त्यांना काही बक्षिसी मिळाली म्हणून ते काहीही बोलत आहेत… असा हल्लाबोल नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे.

 

राणेंचा मलिकांवर हल्लाबोल

 

लोकांचे शर्ट, पँट पाहण्यासाठी नवाब मलिक (Nawab Malik) दुसऱ्यांच्या बेडरुमध्ये जातातच का?, ही चांगली सवय नाही.
असा टोला नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत मलिकांना लगावला होता.
मलिक यांनी 2 नोव्हेंबर रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
वानखेडे वापरत असलेल्या महागड्या वस्तूंच्या किमती सांगून एवढे पैसे वानखेडेंनी कुठून आणले, असा सवाल विचारला होता.
यावेळी मलिक यांनी वानखेडे 50 हजारांचे शर्ट पँट वापरतात असे म्हटले होते.
या सर्व प्रकरणावर राणेंना विचारले असता त्यांनी मलिकांवर टोलेबाजी केली.

 

काय म्हणाले नवाब मलिक?

 

राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो. ज्यांनी पक्षप्रवेश करुन मंत्रिपद नाही सांगायची गरज नाही.
हे सरकार 25 वर्षे चालेल कोणी त्याची काळजी करु नये.
कोणाच्या कुटुंबापर्यंत मी गेलो नाही. पण ड्रग्सचा पैसा आला तर त्यातून अल्बम (Album) बनवला जातो त्यावर गप्प बसायचे का? अशा शब्दात मलिक यांनी प्रत्युत्तर दिले.

 

दिवाळीनंतर पुरावे देणार

 

दरम्यान, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांचा ड्रग्स पेडलरशी (Drugs peddler)
संबंध असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. त्यासंदर्भातील काही फोटो त्यांनी प्रसिद्ध केले होते.
फडणवीस यांना हे आरोप खोडून काढताना मलिकांचे अंडरवर्ल्डशी (Underworld) संबंध असल्याचा आरोप केला आहे.
दिवाळीनंतर याचे पुरावे देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केलं आहे.

 

Web Title : Nawab Malik | ncp leader nawab malik criticized narayan rane

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Supreme Court | ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, जाणून घ्या

Kiran Gosavi | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील NCB चा ‘पंच’ किरण गोसावीच्या पोलिस कोठडीत वाढ (व्हिडीओ)

EPFO | बँक अकाऊंटमध्ये आले नसेल PF चे व्याज तर इथं करा तक्रार, मिस्ड कॉलशिवाय SMS द्वारे 1 मिनिटात जाणून घ्या बॅलन्स