Nawab Malik | फडणवीसांच्या ‘त्या’ पहाटेच्या शपथविधीवर नवाब मलिकांचा हल्लाबोल; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Nawab Malik | मागील दोन वर्षापुर्वी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पहाटे शपथविधी घेतली होती. यामुळे हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला होता. यावरुन राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी निशाणा साधला आहे.

 

देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखती दरम्यान बोलताना अजित पवारांसोबतच्या पहाटेच्या शपथविधीवर पश्चाताप व्यक्त केला होता.
तर, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) कामगिरीवर नाराजी व्यक्त करत, जोरदार टीकास्त्र सोडलं.
‘शिवसेनेने आमचा विश्वासघात केला. त्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी अजित पवार यांच्यासोबत मिळून सरकार स्थापन केले.
कारण आमच्या पाठीत खंजीर खुपसले होते, असं फडणवीस म्हणाले होते.

 

आम्ही जशास तसे उत्तर’ देण्याचा विचार केला. पण आम्हाला आजही या गोष्टीचा पश्चाताप होत आहे. तसं नसतं झालं तर, चांगलं झालं असतं.
मला माहीत आहे की, त्यावेळी काय घडलं आणि कुणी काय केलं होतं. तर, मी एक पुस्तक लिहित असून, त्यात लवकरच सर्व घटना उजेडात आणणार आहे.
महाराष्ट्रात केवळ सरकार आहे, शासन नाही, अशीही टीका फडणवीस यांनी केली.

 

दरम्यान, फडणवीस यांनी केलेल्या या विधानानंतर नवाब मलिक (Nawab Malik) यांनी जोरदार टीका केली आहे.
‘चिड़िया चुग गई खेत,’ या म्हणीचा उल्लेख करत जोरदार टोला लगावला आहे.
एखादी गोष्ट केल्यानंतर त्याचा पश्चाताप करणे व्यर्थ आहे, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
तसेच, सत्तेशिवाय त्यांना राहावत नाही, अशी टीका देखील नवाब मलिकांनी केली आहे.

 

Web Title : Nawab Malik | ncp leader nawab malik criticizes bjp devendra fadnavis over oath ceremony with ajit pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Devendra Fadnavis | पहाटेचा शपथविधी, ‘बेईमानी’ अन् ‘पश्चाताप’ ! संपूर्ण घटनाक्रमाचा होणार उलगडा; फडणवीसांचे पुस्तक लवकरच होणार प्रसिद्ध

Aishwarya Sharma-Neil Bhatt Wedding | लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी तयार नील भट्ट-ऐश्वर्या शर्मा

Supriya Sule | डान्स व्हिडीओवर टीका करणार्‍यांना सुप्रिया सुळेंचे उत्तर; म्हणाल्या…