Nawab Malik | नवाब मलिक झाले ‘बिनखात्याचे मंत्री’ ! मलिकांकडे असलेल्या खात्यांचा आणि इतर पदभार ‘या’ 6 दिग्गजांकडे सुपूर्द

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने (ED) अटक (Arrest) केली आहे. ईडीच्या या कारवाईनंतर विरोधी पक्षाने (Opposition Party) नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याची (Resignation) मागणी केली आहे. मात्र, मलिक यांचा राजीनामा घेणार नसल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली आहे. मलिकांचा राजीनामा न घेतल्याने त्यांच्याकडे असलेल्या खात्याची कामे कशी होणार असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. त्यावर आता महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) नवाब मलिक यांचा राजीनामा न घेता देखील विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

 

नवाब मलिक (Nawab Malik) यांना 23 फेब्रुवारी रोजी ईडीने अटक केली आणि राज्यात एकच खळबळ उडाली. त्यानंतर विरोधकांनी सातत्याने मलिकांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. मात्र खुद्द शरद पवार (Sharad Pawar) यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली. त्यामुळे मलिकांच्या राजीनाम्याच्या चर्चांवर पडदा पडल्याचे पाहायला मिळत होतं.

 

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharashtra Budget Session) पहिल्या दिवसापासून विरोधी पक्ष असलेल्या भाजपने (BJP) नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. तसेच त्यांच्याकडे असलेल्या खात्यातील कामे कशी होणार असा सवाल उपस्थित केला होता. विरोधकांकडून होणाऱ्या मागणीमुळे अखेर शरद पवार यांनी काल (गुरुवार) पक्षातील वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेऊन याबाबत चर्चा केली. यानंतर नवाब मलिक यांच्याकडे असणाऱ्या खात्यांचे आणि जबाबदाऱ्यांचे वाटप केलं आणि नवाब मलिकांचे मंत्रिपद कायम ठेवलं.

 

कोणाला कोणती जबाबदारी

राजेश टोपे – कौशल्य विकास मंत्री (Rajesh Tope – Minister for Skill Development)

जितेंद्र आव्हाड – अल्पसंख्याक मंत्री (Jitendra Awhad – Minister for Minorities)

धनंजय मुंडे – पालकमंत्री परभणी (Dhananjay Munde – Guardian Minister Parbhani)

प्राजक्त तनपुरे – पालकमंत्री गोंदिया (Prajakt Tanpure – Guardian Minister Gondia)

राखी जाधव – कार्याध्यक्ष मुंबई (Rakhi Jadhav – Working President Mumbai)

नरेंद्र राणे – कार्याध्यक्ष मुंबई (Narendra Rane – Working President Mumbai)

 

नवाब मलिक यांच्याप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या वादग्रस्त परिस्थितीत बिन खात्याचे मंत्री होण्याचा प्रकार या आधी घडला नाही. परंतु अनेक अशी काही उदाहरणे आहेत, ज्यामध्ये त्यांना खाती मिळाली नाहीत पण ते मंत्री होते. जसा प्रकार राज्यात घडला तसा प्रकार केंद्रात देखील घडला आहे. राज्यात अनेक वेळा उपमुख्यमंत्री बिन खात्याचे मंत्री असायचे. केंद्रात शंकरराव चव्हाण (Shankarrao Chavan) हे देखील अनेक दिवस बिन खात्याचे मंत्री राहिले आहेत.

 

Web Title :- Nawab Malik | NCP leader nawab malik ed case these ministers were given additional charge and other responsibility

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा