Nawab Malik |’समीर वानखेडे अल्पवयीन असताना त्यांना दारुच्या दुकानाचा परवाना’; मलिकांचा खळबळजनक आरोप (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन एनसीबीचे (NCB) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर निशाणा साधाला आहे. यावेळी नवाब मलिक (Nawab Malik) यांनी त्यांच्या वडिलांवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. वानखेडे यांचे वडील उत्पादन शुल्क विभागात (Excise Department) कार्यरत असताना त्यांनी आपल्या अल्पवयीन (Minor) मुलाच्या नावाने दारुच्या दुकानाचा परवाना (Liquor shop License) दिला. संबंधित बारचा परवाना हा 1997 साली जारी करण्यात आला होता. त्यावेळी समीर वानखेडे 18 वर्षाचे झाले नव्हते, असा खळबळजनक दावा नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच वानखेडे यांनी आपली खरी संपत्ती केंद्र सरकारला सांगितलेली नाही.

 

समीर वानखेडे यांचे वडील उत्पादन शुल्क विभागात कार्यरत होते आणि फर्जीवाड्यात ते माहीर होते. मी शेअर केलेला कागद मला उत्पादन शुल्क विभागाने दिला आहे. त्या कागदात तुम्ही बघाल तर 1997 आणि 1998 सालाचं जे ठाणे जिल्ह्याचं रजिस्ट्रेशन आहे, त्यामध्ये लायसन्स नंबर 875 असं असून सद्गगुरु हॉटेल (Sadhguru Hotel) नावाने दारुच्या दुकानाचा परवाना जारी केलेला होता. जो परमीट देण्यात आला होता तो समीर ज्ञानदेव वानखेडे (Sameer Dnyandev Wankhede) नावाने देण्यात आला होता. ते परमीट 1997 पासून समीर वानखेडेंच्या नावाने रिन्यू झालं होतं. शेवटचं रिनेवल हे 2022 पर्यत करण्यात आले आहे. त्यासाठी 3 लाखापेक्षा जास्त पैसे भरण्यात आल्याचा दावा, नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे.

नवाब मलिक पुढे म्हणाले, विशेष म्हणजे ज्यावेळी पहिला परवाना देण्यात आला त्यावेळी समीर वानखेडे यांचं वय 17 वर्षे 10 महिने 19 दिवस होते. वडील डिपार्टमेंटमध्ये काम करतात म्हणून मुलगा अल्पवयीन असताना त्याच्या नावाने परवाना जारी करण्यात आला हा सर्वात मोठा फर्जीवाडा आहे. वय वर्षे 18 कमी असलेल्यांना लायसन्स दिलं जाऊ शकत नाही. अल्पवयीन मुलाला परवाना देण्यात आला आणि त्याच्या नावानेच आजही सद्गगुरु बार आणि रेस्टॉरंट वाशीमध्ये सुरु आहे. 1997 सालापासून आजपर्यंत जवळपास 24 वर्षे होत आले आहेत,एकाही वर्षी लायसन्स सस्पेंड होण्यासारखा प्रकार घडला नाही. त्यांनी फर्जीवाडा करुन ते रेस्टॉरंट सुरु केलं आणि आजही ते समीर ज्ञानदेव वानखेडे तसेच समीर दाऊद वानखेडे (Sameer Dawood Wankhede) नावाने चालत असल्याचा आरोप त्यांनी केला.

समीर वानखेडे यांनी 2017 मध्ये आपली संपत्ती जाहीर केली. त्यामध्ये सद्गगुरु हॉटलची 1995 सालची किंमत एक कोटी होती असे म्हटले आहे. तसेच ती संपत्ती त्यांच्या आई आणि वडिलांच्या नावावर आहे. त्यांच्या आईकडून ही संपत्ती मिळाली आहे. तसेच 2 लाख 40 हजार वार्षीक भाडे येत आहे, असेही म्हटले आहे. त्यानंतर त्यांनी 2020 साली देखील DOPT आणि त्यांच्याशी संबंधित डिपार्टमेंटला माहिती दिली होती. केंद्र सरकारमध्ये कामासाठी रुजू होणाऱ्या आयएएस (IAS), आयपीएस (IPS) इत्यादी अधिकाऱ्यांना त्यांच्या संपत्तीची माहिती सरकारला द्यावी लागते. मग ही बाब वानखेडे यांनी का लपवली? नोकरी घेतल्यानंतर 2017 पर्यंत त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती लपवल्याचे मलिक यांनी सांगितले.

 

समीर वानखडे यांनी 2017 मध्ये माहिती दिली की, त्या संपत्तीमधून त्यांना भाडे येते.
पण खरंतर ते तिथून शराबखाना चालवण्याचे काम करत आहेत.
सर्व्हिस कंडक्ट नियमानुसार (Service conduct rules) केंद्र सरकारमधील कोणताही अधिकारी नोकरी करताना व्यवसाय करु शकत नाही.
ज्या प्रकारे साऱ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्या हिशोबाने त्यांनी गोष्टी लपवल्याचे स्पष्ट होते. त्यांना नोकरीत राहण्याचा अधिकार नाही.
आम्ही तीन ते चार दिवसात DOPT कडे यासंदर्भात तक्रार करु, असा इशारा मलिक यांनी दिला.

 

Web Title :- Nawab Malik | ncp leader nawab malik new allegations on ncb officer sameer wankhede about liquor shop license

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Sharad Pawar | 3 कृषी कायदे रद्द केल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले – ‘उशिरा का होईना, शहाणपण आलं’

Earn Money | केवळ 5 हजार रुपये लावून सुरू करा ‘हा’ बिझनेस; दरमहिना 30 हजार रुपयांची होईल कमाई, मोदी सरकार देईल सबसिडी

Multibagger Stock | 20 रुपयावरून 9,985 वर पोहचला ‘हा’ शेयर, गुंतवणुकदारांचे 20 हजार झाले 1 कोटी रुपये; तुमच्याकडे आहे का?