Nawab Malik | नवाब मलिकांचा मोठा गौप्यस्फोट ! म्हणाले – ‘समीर वानखेडे PM मोदींहून पुढे गेले; 1 लाखाची पँट, 70 हजारांचा शर्ट, अन्…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Nawab Malik | काही दिवसापुर्वी मुंबई ड्रग्ज पार्टीचा एनसीबीने पर्दाफाश केला. त्यानंतर या प्रकरणाला एक वेगळंच वळण लागल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आजही मलिक यांनी खळबळजनक आरोप केले आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

 

नवाब मलिक (Nawab Malik) यांनी म्हटलं आहे की, समीर वानखेडे इतके प्रमाणिक अधिकारी आहे ती, त्यांचा पेहराव आणि राहणीमान जर पाहिलं तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींहून (PM Narendra Modi) पुढे गेलेत. तुम्ही समीर वानखेडेंचे सर्व फोटोज पाहा. शूज पाहा. २-२ लाखांचे शूज वापरतात, शर्ट ज्याची किंमत 50 हजारांहून अधिक आहे असे शर्ट वापरतात.
टी शर्ट तुम्ही पाहिले तर ज्याची किंमत 30 हजारांपासून सुरू होते. दररोज घड्याळ बदलतात मनगटावर लाखो रुपयांचे घड्याळ आहेत.
20 लाखांपासून 1 कोटी रुपयांचे घड्याळ आहेत. प्रामाणिक अधिकाऱ्याचे हे राहणीमान आहे. असं राहणीमान संपूर्ण देशातील नागरिकांचे व्हावे.

 

समीर वानखेडे वापरत असलेले कपडे, शूज आणि घड्याळ किती महाग आहेत याबाबत मलिकांनी खुलासा करत गंभीर आरोप केला आहे.
त्यावेळी बोलताना पुढे मलिक म्हणाले, समीर वानखेडेंचा शर्ट 70 हजारांचा का असतो. दररोज नवनवीन कपडे का येतात? मोदी साहेबांहूनही पुढे गेले आहेत.
पॅन्ट लाख रुपयांची, पट्टा दोन लाखांचा, शूज अडीच लाखांचे, घड्याळ 50 लाख रुपयांचे वापरतात. जे कपडे ते वापरतात त्याची एकूण किंमत करोडोंच्या घरात आहे.
यापेक्षा अधिक प्रामाणिक कुणी असू शकत नाही जो लाखोंचे कपडे, शूज वापरतो.

दरम्यान, किरण गोसावी, भानुशाली, फ्लेचर पटेल, आदिल उस्मानी, सॅम डिझूझा, पठाण हे सर्व प्रायव्हेट आर्मीचे मेंबर आहेत.
ही प्रायव्हेट आर्मी समीर वानखेडे चालवत आहेत. बॉलिवूड कलाकारांना अडकवून त्यांच्याकडून वसुली करण्यात आली आहे.
अनेक निर्दोष लोकांना या प्रायव्हेट आर्मीने अडकवलं असून वसुली केली आहे. असं नवाब मलिक म्हणाले.

 

Web Title : Nawab Malik | NCP Leader nawab malik said sameer wankhede went ahead of narendra modi wankhede wear 1 lakh rupees pant watch worth rs 20 lakh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Deglur Assembly bypolls result | भाजपाला धक्का ! देगलूर पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी

Anil Deshmukh | अनिल देशमुखांची दिवाळी ED च्या कोठडीत, न्यायालयाने सुनावली ‘एवढ्या’ दिवसांची कोठडी

PMGKY | 2 दिवसांत देशभरात बंद होणार मोफत रेशनचे वितरण ! 80 कोटी गरीब जनतेवर होणार PMGKY बंद केल्याचा परिणाम