Nawab Malik | ‘होय, मुख्यमंत्र्यांनी माझी प्रशंसा केली, शरद पवार माझ्या पाठिशी’ – नवाब मलिक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Nawab Malik | आर्यन खान प्रकरणानंतर राज्यात एक वेगळाच प्रकार पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. यामुळे राज्यात सत्ताधारी आणि विरोधकात राजकीय शीतयुद्ध पाहायला मिळत आहे. त्यातच ‘माझ्या पाठिशी जसे मंत्रीमंडळ आहे, तसे राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार (Sharad Pawar) व राष्ट्रवाद पक्षही पाठिशी असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. ते परभणीत एका कार्यक्रमात बोलत होते.

 

मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ज्यांना सध्या घेरले आहे, त्यांची चांगलीच पळापळ होत आहे.
असं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी म्हटलं होतं.
तसेच, ‘गुड गोईंग’ या शब्दात त्यांनी नवाब मलिक यांचे कौतुक केल्याची चर्चा देखील मिडियात रंगली.
या पार्श्वभुमीवर पत्रकारांनी नवाब मलिक यांना विचारणा केली असता.

होय, मुख्यमंत्र्यांनी माझं कौतुक केल्याचं त्यांनी म्हटलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्या कामाची प्रशंसा केली आणि संपूर्ण मंत्रिमंडळ माझ्या पाठीशी असल्याची माहिती मलिक यांनी दिली आहे.

 

त्यावेळी बोलताना मलिक म्हणाले, माझी लढाई ही अन्यायाविरोधात आहे.
सध्या ही लढाई लढण्यासाठी मी एकटा पुरेसा असून ही लढाई पूर्णत्वास नेल्याशिवाय थांबणार नाही.
असा इशारा त्यांनी दिला. तसेच, भाजपवर (BJP) जोरदार टीका देखील केली.
तुमच्याकडे चाणक्य आहे, तर आमच्याकडे तालमीतला बाप आहे, अशी जोरदार टीका नवाब मलिकांनी केली आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल ट्वीटरवर मला एका जनावराची उपमा देण्याचा प्रयत्न केला.
भाजपचे नेते नेहमीच प्राण्यांची नावे देत असतात. त्यातून त्यांची काय संस्कृती आहे हे दिसून येते असा टोला मलिक यांनी लगावला.
भाजपचे नेते माणसाला माणूस समजत नाहीत. माणसाला जनावराची उपमा देणे ही यांची संस्कृती आहे.
या उपाधीमुळे आमची इज्जत जात नाही, उलट भाजपची काय मानसिकता आहे हे स्पष्ट होते. असं मलिक यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : nawab malik | ncp leader nawab malik yes cm uddhav thackeray praised me sharad pawar backed me nawab malik bjp leader devendra fadanvis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Chandrakant Patil | ‘नवाब मलिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, त्यांची NIA चौकशी व्हावी’ – चंद्रकांत पाटील

ST Workers Strike Pune | पुण्यातील स्वारगेट एसटी स्टॅन्डवर कर्मचाऱ्यांचे मुंडन आंदोलन (व्हिडीओ)

EPFO | ‘या’ 4 पद्धतीने चेक करा आपल्या PF अकाऊंटचा बॅलन्स, जाणून घ्या सविस्तर