Nawab Malik | राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना जीवे मारण्याच्या धमकीचा कॉल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nawab Malik | राष्ट्रवादी काॅग्रेसचे (NCP) प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना जीवे मारण्याची धमकी (threat call) मिळाली असल्याची माहिती आली आहे. एका निनावी कॉलने त्यांना धमकी देण्यात आल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलं आहे. तर, मलिकांना हा निनावी काॅल हा राजस्थान येथुन आला होता. याबाबत त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्याची माहिती समोर येत आहे.

 

समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे चांगले काम करत आहेत त्यांच्या कामात अडथळा आणू नका आणि टार्गेट करु नका असं देखील धमकावणाऱ्याने म्हटल्यांचं म्हटलं जात आहे. अशा प्रकारामुळे मलिक (Nawab Malik) यांच्या सुरक्षेतही वाढ केली आहे. मुंबईतील क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी (Drugs party case) एनसीबीने केलेल्या कारवाईवर नवाब मलिक एनसीबीवर वारंवार आरोप करत आहेत. मागील काही दिवसांपासून मलिक पत्रकार परिषद घेत एनसीबीवर (NCB) अनेक गंभीर आरोप करत आहेत. तसेच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरही मलिक यांनी आरोप केले आहेत.

 

काय आहे प्रकरण?

नवाब मलिक (Nawab Malik) आणि समीर वानखडेंचे (Sameer Wankhede) दुबईतील हॉटेलमधील फोटो काल ट्विट केले. आपण दुबईला गेलोच नव्हतो, असा दावा समीर वानखडेंनी केला होता. हा दावा फेटाळून लावत, मलिक यांनी समीर वानखडे दुबईतील हॉटेलमध्ये बसल्याचे काही फोटो ट्विट केले आहेत. तर, मलिक विरुद्ध वानखडे क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एका व्हॉट्सअप मेसेजच्या आधारे समीर वानखडेनं बोगस कारवाई केल्याचा आरोप नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून करत आहेत. एका दौऱ्याच्या वेळी वानखडे दुबईला गेल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. हा आरोप फेटाळून लावत आपण दुबईला गेलोच नसल्याचं वानखडेंनी सांगितलं आहे. त्यानंतर मलिक यांनी काही फोटो ट्विट केले आहे.

 

दरम्यान, गेल्या 15 दिवसांपासून माझ्या मृत आईवर, रिटायर्ड वडिलांवर आणि बहिणीवर नजर ठेवली जात आहे.
माझ्या कुटुंबावर घाण शब्द आणि वैयक्तिक आरोप केले जात असून त्याचे मी खंडण करतो.
तर, मी माझं काम करतोय, देशाची सेवा आणि ड्रग्सवर कारवाई करतोय यासाठी मला तुरुंगात टाकणार असाल तर मी तयार आहे.
असं NCB अधिकारी समीर वानखेडे यांनी 21 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

 

Web Title :- Nawab Malik | ncp minister nawab malik claimed he received threat call

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | अजित पवारांनी राज्यात खरेदी-विक्री झालेल्या साखर कारखान्यांची यादीच दाखवली वाचून

Pune Crime | पुण्यात भरदिवसा बेछुट गोळीबार; वाळू व्यावसायिक संतोष जगतापसह दोघांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक (व्हिडीओ)

Pune Crime | पुण्यात टोळीयुध्द भडकले ! भरदिवसा दोन गँगमधील सराईतांची एकमेकांवर फायरिंग; अप्पा लोंढें गँगमधील संतोष जगतापसह तिघांची प्रकृती चिंताजनक (व्हिडीओ)