Nawab Malik | ‘दुसऱ्याची मालमत्ता जप्त करुन अजित पवारांचे नाव गोवण्याचे कारस्थान’ – नवाब मलिक

ADV

मुंबई : वृत्तसंस्था –  Nawab Malik | मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी विरोधकांवर आरोपाचे सत्रच सुरू केलं आहे. डग्ज प्रकरणानंतर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. त्यानंतर मलिकांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) संबधित मालमत्तेवर आयकर विभागाने (Income Tax Department) कारवाई केलीय. या पार्श्वभुमीवर देखील मलिकांनी थेट आयकर विभागाच्या कारवाईवर आरोप केले आहेत.

 

नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार आपली जबाबदारी पार पाडत असताना केंद्र सरकार (Central Government)
सत्तेचा गैरवापर करुन राज्य सरकार (State Government) अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे.
मात्र या प्रयत्नाला राज्य सरकार किंवा त्यातील एकही व्यक्ती न घाबरता लढा देणार, असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.
तसेच, अजितदादा पवार यांच्याशी संबधित मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त करण्यात आल्याचे वृत्त आहे.
मात्र यात कोणतेही तथ्य नसल्याचे मलिक यांनी म्हटले आहे. कोणतीही संपत्ती ही बेनामी नसते. त्याचा कुणीतरी मालक असतोच.
त्यामुळे दुसऱ्या कुणाचीतरी संपत्तीवर टाच आणून त्याला अजितदादांचे नाव देणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.

पुढे बोलताना नवाब मलिक म्हणाले की, भाजपच्या (BJP) नेत्यांची त्यांच्या नोकरांच्या, केंद्रीय मंत्र्यांच्या किचन कूकच्या नावे संपत्ती असल्याचेही समोर येऊ शकते.
पण अशा प्रकरणातून केवळ बदनामी केली जाते. भुजबळ यांच्याबाबतीतही असेच झाले होते.
महाराष्ट्र सदनात घोटाळा झाल्याचा आरोप होत असताना न्यायालयाने त्यावर सुनावणी केली आहे.
त्यात भुजबळांना निर्दोष मुक्त केले. केवळ घाबरवण्याचे आणि धमकावण्याचा खेळ सुरु आहे.
यातून आम्ही घाबरुन जाणार नाही, असा दावा मलिक यांनी केला आहे.

 

Web Title : Nawab Malik | ncp minister nawab malik conspiracy get ajit pawars name confiscating anothers property nawab malik accused

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Bitcoin | 13 वर्षांचे झाले बिटकॉईन, सहा पैशांपासून सुरू केलेला प्रवास पोहचला 48.2 लाखांपर्यंत

Indrani Balan Foundation | पहिली ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! पुनित बालन ग्रुप संघाचा सलग दुसरा विजय; व्हिज्डम् क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाची विजयी सलामी !

MLA Gopichand Padalkar | ‘आर्यन खान या नशेबाज पोराला वाचविण्यासाठी ठाकरे सरकारचा आटापिटा’ – गोपीचंद पडळकर