Nawab Malik | ‘पुरावा दिला तर…’ ! नवाब मलिकांनी शेअर केला क्रांती रेडकरच्या चॅटचा स्क्रीनशॉट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Nawab Malik | मुंबई क्रूझ पार्टी प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच त्यांचे आरोपांचे सत्र सुरूच आहे. मलिकांनी काल नवीनच फोटो शेअर केला होता. त्यानंतर त्यांनी आणखी एक ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. ‘अरे माझ्या देवा’ म्हणत, समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांच्या चॅटचे स्क्रीनशॉट शेअरही केलेत.

 

नवाब मलिकांनी (Nawab Malik) याबाबत आज एक स्क्रीनशॉटसह ट्विट केलं आहे.
तर त्यामध्ये कोणीतरी एक व्यक्ती क्रांती रेडकर यांना मलिकांविरोधातील पुरावे असल्याचे सांगतात.
क्रांती रेडकर कुठला पुरावा आहे, असं विचारतात. मलिकांचा दाऊदसोबत फोटो असल्याचं ती व्यक्ती सांगतेय.
त्यानंतर मलिकांविरोधात पुरावा दिला तर मी बक्षीस देईल, असं क्रांती रेडकर (Kranti Redkar) रिप्लाय देतात.
असं स्क्रीनशॉट शेअर करत ”ओ माय गॉड” (अरे माझ्या देवा) असं कॅप्शन दिलं आहे.

 

मलिकांच्या या ट्विटनंतर क्रांती रेडकर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
मी कोणासोबतही चॅट केली नसून मलिकांनी हे एडीट केलं आहे.
नवाब मलिकांनी पडताळणी न करता पुन्हा एकदा अशी पोस्ट केली आहे.
तसेच मुंबई सायबर सेलकडे तक्रार करणार असल्याचं क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : Nawab Malik | NCP minister nawab malik shared kranti redkar chats screenshot sameer wankhede case marathi news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पुण्यात जांभूळवाडी दरीपुलाजवळ दगडाने ठेचून तृतीयपंथीचा खून, परिसरात खळबळ

Indian Railways | रेल्वे विभागाचा निर्णय ! ट्रेन रद्द झाल्यास तिकीटाचे पैसे आपोआप तुमच्या खात्यावर जमा होणार; जाणून घ्या

E-Commerce | अमेझॉन, फ्लिपकार्टसह 5 ई-कॉमर्स कंपन्यांना मोठा झटका, या महत्वाच्या नियमाचे करत नव्हते पालन