Nawab Malik | ‘…बिनशर्त माफी मागतो’, नवाब मलिक यांचे वानखेडे प्रकरणात उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nawab Malik | मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे एनसीबीचे (NCB) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर आरोप करीत आहे. मात्र सध्या आरोपांचे सत्र थांबलं आहे. मलिकांनी वानखेडे प्रकरणात (Wankhede case) मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) हमी देणारे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. या दरम्यान त्यांनी न्यायालयात खेद व्यक्त केले. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. बिनशर्त माफी मागतो आणि यापुढे अशी विधाने करणार नाही, अशी हमी त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे (Affidavit) दिली आहे.

नवाब मलिक (Sameer Wankhede) यांनी आज (शुक्रवारी) 4 पानी प्रतिज्ञापत्र दाखल करून न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली आणि यापुढे वानखेडे यांच्याविषयी कोणतीही विधाने करणार नसल्याची त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे हमी दिली आहे. ‘मी फक्त माझ्या सरकारी सेवकपदाच्या अधिकारात वक्तव्ये केली. मी वानखेडे यांच्याविषयी कोणतीही व्यक्तिगत विधाने केली नाहीत. ‘यापूर्वी व्यक्त केलेल्या वक्तव्यांविषयी खेद व्यक्त करतो. न्यायालयाच्या (Mumbai High Court) आदेशाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. असं ते म्हणाले.

तसेच, वानखेडे यांच्याविषयीच्या कोणत्याही विधानाने न्यायालयातील हमीचे उल्लंघन होते, असे मला आता समजावण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे त्यांच्याविषयी कोणतेही विधान मी करणार नाही. मात्र, केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय हेतूने होणारा वापर आणि त्या यंत्रणांच्या अधिकाऱ्यांकडून पदाचा होणारा दुरुपयोग याविरोधात बोलण्यास मला प्रतिबंध असल्याचा अर्थ माझ्या या हमीचा घेतला जाऊ नये’, असं त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे.

दरम्यान, मलिकाविरोधात आक्षेप नोंदवणारा अर्ज ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhede) यांनी केला होता.
दरम्यान, न्या. शाहरुख काथावाला (Justice Shah Rukh Kathawala) आणि न्या. मिलिंद जाधव (Justice Milind Jadhav)
यांच्या खंडपीठाने नवाब मलिक (Nawab Malik) यांना जाब विचारत न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याबद्दल तुमच्याविरुद्ध नोटीस का काढू नये,
याबाबत प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे मलिक यांनी आज हमी देणारे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

 

Web Title :- Nawab Malik | ncp minister nawab malik unconditional apology for his remarks on sameer wankhede in bombay high court

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Temperature | डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्र गारठणार, जाणून घ्या पुण्यातील स्थिती

Ajit Pawar | कोरोनाबाबत निर्बंध, बुस्टर डोस आणि आरोग्य विभागाच्या परीक्षेसंदर्भात अजित पवारांचं महत्वाचं विधान; म्हणाले… (व्हिडीओ)

Privatization of Airports | आगामी 5 वर्षात नागपुरसह आणखी 25 विमानतळांचे खासगीकरण, ‘ही’ आहे पूर्ण यादी