Nawab Malik | राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिकांचे समीर दाऊद वानखेडेंबद्दल 2 खळबळजनक ट्विट, म्हणाले – ‘पहचान कौन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Nawab Malik | आर्यन खान प्रकरणात एनसीबी अधिकारी आणि पथक चौकशीच्या मार्गे लागलं आहे. अनेक नवंनवे खुलासेही चौकशीत होताना दिसत आहेत. तसेच दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रवक्ते (NCP) तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे एनसीबी (NCB) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर खळबळजनक आरोप करत आहेत. तसेच आता व्यक्तीगत स्वरुपाचे आरोप देखील केले जात आहेत. अशाच पद्धतीचे नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्याबाबत दोन खळबळजनक ट्विट केले आहेत. यावरुन चर्चेला उधाण आलं आहे.

 

नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पहिल्या ट्विटमध्ये समीर वानखेडे यांचा एकट्याचा फोटो शेअर केला आहे.
हा फोटो शेअर करताना नवाब मलिक यांनी पहचान कौन? असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे.
त्याचबरोबर मलिक यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये महापालिकेच्या एका सर्टिफिकेटचा फोटो पोस्ट केला आहे.
शेअर केलेलं कागदपत्र नेमकं कशा संबंधातील आहे, हे स्पष्टपणे दिसून आलं नाही.
पंरतु, हे कागदपत्र शेअर करताना नवाब मलिक यांनी समीर दाऊद वानखेडे यांचं फर्जीवाडा येथून सुरु झालं असं कॅप्शन त्यामध्ये दिलं आहे.

 

दरम्यान, मागील काही दिवस नवाब मलिक (Nawab Malik) हे एनसीबीच्या कामकाजाबाबत अनेक प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत.
विशेष तर मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनाच धारेवर धरले आहे. समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर अनेक आरोप केले जात आहेत.
या प्रकरणामुळे राज्यात मोठी चर्चा रंगली आहे.

 

Web Title : Nawab Malik | NCP Minister Nawab Malik’s 2 sensational tweets about NCB Zonal Officer Sameer Dawood Wankhede, said – ‘pehchan kaun’

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

T20 World Cup 2021 | PAK विरुद्धच्या पराभवानंतर कॅप्टन विराट कोहलीनं दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…

Multibagger Stocks | 4.45 रूपयांचा हा शेयर झाला 998 रुपयांचा, एक वर्षात दिला 22,300% चा रिटर्न; गुंतवणुकदारांचे 1 लाख झाले 2.24 कोटी

Bank Locker Rules | बँक लॉकरच्या नियमांमध्ये मोठा बदल, जर तुम्ही सुद्धा घेतला असेल ‘लॉकर’ तर जाणून घ्या नवीन नियम